वाढलेलं Uric Acid कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं आलं, जाणून घ्या कसा कराल वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 09:46 AM2024-03-12T09:46:02+5:302024-03-12T09:46:24+5:30
यूरिक अॅसिड वाढलं तर सुरूवातीला लोकांना याबाबत माहिती मिळत नाही. पण काही अशी लक्षण आहेत ज्यांकडे लक्ष दिलं तर याची माहिती मिळू शकते.
डायबिटीस आणि ब्लड प्रेशर प्रमाणेच आजच्या काळात जास्तीत जास्त लोकांना यूरीक अॅसिडची समस्याही खूप होत आहे. ही समस्या तेव्हा होते जेव्हा कोणत्या कारणाने किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमी होते. अशात यूरिया, यूरिक अॅसिडमध्ये बदलतो आणि ते हाडांच्या मधे जमा होतं. जे या समस्येचं मोठं कारण आहे.
यूरिक अॅसिड शरीराच्या सेल्स आणि अशा गोष्टींपासून तयार होतं जे आपण खातो. यातील यूरिक अॅसिडचा जास्तीत जास्त भाग किडनी फिल्टरच्या माध्यमातून टॉयलेटच्या माध्यमातून शरीरातून बाहेर जातो. पण हे अॅसिड बाहेर निघत नसेल तर ते रक्तात वाढतं.
नंतर याने गाउटची समस्याही होते. या उपचारात काही घरगुती उपायही कामात येतात. ज्यातील एक म्हणजे आलं. आल्यामध्ये असे अनेक गुण असतात जे ही समस्या कंट्रोल करण्यास मदत करतात.
यूरिक अॅसिड वाढण्याची लक्षण
यूरिक अॅसिड वाढलं तर सुरूवातीला लोकांना याबाबत माहिती मिळत नाही. पण काही अशी लक्षण आहेत ज्यांकडे लक्ष दिलं तर याची माहिती मिळू शकते. जसे की, जॉईंट्समध्ये वेदना, उठण्या-बसण्यात समस्या, पाय आणि बोटांवर सूज, पायांच्या आणि हातांच्या बोटांमध्ये टोचल्यासारखं वाटणे इत्यादी.
यूरिक अॅसिड कंट्रोल करतं आलं
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, चहामध्ये आल्याचा वापर केला तर अनेक फायदे मिळतात. आलं हे एक आयुर्वेदिक औषधी आहे. याचा वापर अनेक आजारांमध्ये केला जातो. ज्यातील एक म्हणजे यूरिक अॅसिड. आल्याने वाढलेलं यूरिक अॅसिड कमी केलं जाऊ शकतं. यात असलेले अॅंटी-इंफ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स प्रॉपर्टीज वाढलेलं यूरिक अॅसिड आणि त्यामुळे होणारी सूज-वेदना कमी करतात.
असा करा आल्याचा वापर
आल्यामुळे इम्यून सिस्टीम मजबूत होतं. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सही भरपूर असतात. वाढलेलं यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी याचा तुम्ही योग्यपणे वापर केला पाहिजे. तुम्ही याचं सेवन चहा किंवा काढ्याच्या रूपात करू शकता. आल्याचा रस तुम्ही मधासोबतही सेवन करू शकता. त्याशिवाय आल्याचा लेप तयार करूनही लावू शकता. याने तुमच्या वेदना कमी होतील.
आल्याचा काढा कसा बनवाल
आल्याचा काढा तयार करण्यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात आलं बारीक करून टाका. नंतर हे पाणी 5 मिनिटांसाठी उकडू द्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर याचं सेवन करा. याने तुम्हाला वेदना होणार नाहीत.