उन्हाळ्यात डोंगरात फिरायला जाणार असाल तर 'या' ४ गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 11:24 AM2019-04-12T11:24:21+5:302019-04-12T11:29:42+5:30
उन्हाळ्यात अनेकजण छोटीशी बॅग पाठीवर घेतात आणि डोंगरांवर फिरायला जातात. पण यासाठी काय तयारी करायला हवी याबाबत त्यांना फार माहिती नसते.
(Image Credit : OutdoorExpertsHQ)
उन्हाळ्यात अनेकजण छोटीशी बॅग पाठीवर घेतात आणि डोंगरांवर फिरायला जातात. पण यासाठी काय तयारी करायला हवी याबाबत त्यांना फार माहिती नसते. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी डोंगर-दऱ्या सर्वात चांगला पर्याय असतात. पण मैदानी परीसरात राहणारे लोक जेव्हा डोंगरावर जातात तेव्हा ते त्या ठिकाणाच्या दृष्टीने तयार नसतात. डोंगरांमध्ये तुम्हाला जर हायकिंग किंवा ट्रेकिंग करायची असेल तर काही तयारी करणे गरजेचे आहे. डोंगरांळ भागात दूरदूरपर्यंत पाणी आणि खाण्यासाठी काही सहजपणे मिळत नाही. तसेच तुम्हीही तुमच्यासोबत फार जास्त साहित्य घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स आणल्या आहेत.
ट्रेकिंगदरम्यान सोबत लिंबू ठेवा
डोंगरात ट्रेकिंग करायला जाणार असाल तर सोबत लिंबू नक्की ठेवा. पायी चालताना तुम्हाला थकवा जाणवला किंवा तुमची एनर्जी कमी झाली तर लिंबाचा रस तुम्हाला पुन्हा एनर्जी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जे शरीराला लगेच एनर्जी देतं. जेव्हाही थकवा जाणवेल लिंबाचा थोडा रस सेवन करत रहा आणि सोबतच ट्रेकिंग करत रहा.
गूळ आणि शेंगदाणे
डोंगरांमध्ये ट्रेकिंग किंवा हायकिंग करणे सोपं नसतं. खासकरुन त्या लोकांसाठी जे मैदानी ठिकाणावर राहतात. जर तुम्ही थंड डोंगरांवर ट्रेकिंग करणार असाल तर थकव्यासोबतच तुम्हाला भूकही लागते. खाण्यासाठी जास्त साहित्यही तुम्ही सोबत ठेवू शकत नाही अशात सोबत गूळ आणि शेंगदाणे ठेवा. जर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या सोबत घेऊन जायच्या नसतील तर शेंगदाण्याची चिक्की तुम्ही नेऊ शकता. गूळ आणि शेंगदाणे तुम्हाला लगेच एनर्जी देऊ शकतात. तसेच याने भूकही दूर होते.
ट्रेकिंग दरम्यान कच्चे तांदूळ
हो हे खरंय..जर तुम्ही ट्रेकिंग करायला जाणार असाल तर थोडे कच्चे तांदूळ सोबत ठेवा. कच्च्या तांदळाने तुम्हाला तहान लागणार नाही. ट्रेकिंग दरम्यान थोडे कच्चे तांदूळ तोंडात ठेवा आणि ते हळूहळू चावत किंवा चघळत रहा. कच्चे तांदूळ चघळल्याने तुम्हाला एनर्जी तर मिळतेच सोबतच तुम्हाला तहानही कमी लागते. तसेच याने तुम्हाला लवकर भूकही लागणार नाही.
नारळाचं पाणी
डोंगरात सर्वात जास्त समस्या येते ती पाण्याची आणि पाणी न मिळाल्याने व्यक्तीला समस्या होतात. या समस्येपासून बचावासाठी तुम्ही एका बॉटलमध्ये नारळाचं पाणी सोबत ठेवू शकता. नारळाचं पाणी तुम्ही २ तासांच्या गॅपने सेवन कराल तर तुम्हाला एनर्जी मिळण्यासोबतच पुन्हा पुन्हा तहान लागण्याची समस्याही होणार नाही.