कोरोना व्हायरसची माहमारी जगभरात वेगाने पसरत आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. या जीवघेण्या आजारापासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी सरकारने आणि जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करणं गरजेचं आहे. घरातून निघताना मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचे नियम लक्षात असायलाच हवेत.
अशावेळी कोणती व्यक्ती व्हायरसने संक्रमित झाली आहे किंवा कोणत्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे ओळखणं कठीण आहे. त्यात आता लक्षणं दिसत नसलेली रुग्ण संख्याही वाढत आहे. अशा स्थितीत स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच लागण होण्यापासून वाचण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
१४ दिवस क्वारंटाईन ठेवा
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचं कळताच तुम्ही स्वतःला क्वारटाईन करायला हवं. कारण संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास १४ ते १० दिवसात लक्षणं दिसायला सुरूवात होऊ शकते. या कालावधीत स्वतःला इतर सदस्यांपासून लांब ठेवा. देवाण घेवाण करताना संपर्क करण्याचा प्रयत्न करा. एका वेगळ्या खोलीत राहा.
लक्षणांवर लक्ष द्या
कोरोनाचं इंन्फेक्शन झाल्यानंतर ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, नाकातून पाणी बाहेर येणं, अशा समस्या उद्भवतात. अशा शारीरिक समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर तपासणी करून घ्या.
टेस्ट करणं
तुमच्यात कोणतीही लक्षणं दिसत नसतील आणि तुम्ही टेस्ट करून घेतली असेल तर इतर व्यक्तींना माहिती देणं गरजेचं आहे. जेणेकरून लोक सुरूवातीपासूनच सावधगिरी बाळगतील. जर तुम्हाला संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची कल्पना आली असेल तर वेळ न घालवता तपासणी करून घ्या. व्हायरस एका व्यक्तीच्या शरीरातून इतर व्यक्तींच्या शरीरात शिंकण्यातून किंवा खोकण्यातून पसरतो. त्यामुळे आधीच सर्तक राहणं गरजेचं आहे.
रोगप्रतिकारकशक्ती
रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. हळद, तुळस, लवंग, जायफळ अशा पदार्थांनी तयार केलेल्या काढ्याचे सेवन करा. व्हिटामीन सी, व्हिटामीन डी असलेल्या फळांचे, पदार्थाचे सेवन करा. गरम पाणी प्या. ताज्या भाज्या, दूध, अंडी, पनीर, शेंगदाणे, उसळी, डाळी यांचा आहारात समावेश करा.
दिलासादायक! अखेर 'या' देशात पुढच्या महिन्यापासून सर्वसामान्यांना दिली जाणार कोरोनाची लस
आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत