दररोज शेकडो रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. बहुतांश रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे असा त्रास होत आहेत. त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी बराच वेळ लागतो. या रुग्णांना सर्वसामान्य व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मानून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोनामुळे हे घडत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कोरोनाचे आगमन होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली येथील बालरोग शल्यचिकित्सक डॉ. शिल्पा शर्मा यांनी सांगितले की, काही काळापासून लोकांना व्हायरल इन्फेक्शन, ताप आणि विविध प्रकारच्या ऍलर्जींच्या वाढत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोना व्हायरसमुळे हे घडत आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या लसीकरणानंतर लोकांची रोगप्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. कोरोना परिणामानंतरची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे, मुले आणि वृद्ध लोक वाढत्या प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन आणि इतर अनेक आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळेच कोरोना नसतानाही आपल्याला त्रास होत आहे.
देशभरात सध्या कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. भारत सरकारकडे उपलब्ध असलेल्या 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत सर्व राज्यांमधील आकडेवारीवरून असं दिसून येते की कोरोनाची प्रकरणे कमी झाली आहेत. बऱ्याच राज्यांमध्ये पेशंट डिस्चार्जचे प्रमाण 99 टक्क्यांहून अधिक आहे. जरी एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तरी त्याची लक्षणं अतिशय सौम्य असतात.
रोग प्रतिकारशक्ती करा मजबूत
अशा वेळी लोकांनी आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने, लहान मुलांनी आणि प्रौढांनी सकस आहार घेतला पाहिजे. ज्यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटामिंस, प्रोटीन, मिनरल्स आणि अन्य न्यूट्रीशन असतात. याशिवाय दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे.