योग आपलं मन आणि शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार किंवा आसने आहेत. त्यातीलच एक आरोग्यासाठी फायदेशीर असं आसन म्हणजे कपालभाति प्राणायाम. हे आसन सर्वात लोकप्रिय आसनांपैकी एक आहे. ज्याने श्वसनक्रियेत सुधारणा होते. याने केवळ मानसिक आरोग्यच चांगलं राहतं असं नाही तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं.
कसं करतात कपालभाति आसन
कपालभाती प्राणायामात सामान्य स्थितीत बसुन सामान्य स्वरूपात श्वास घेतला जातो व श्वास सोडला जातो, श्वास सोडतांना आपल्या पोटाच्या आतडयांना संकुचित करावे लागते. ही क्रिया योगाभ्यासातील मध्यम क्रिया मानली जाते. आज ही क्रिया विश्वभरात सर्वत्र केली जाते, विविध योग शिबीरात किंवा जे योगाचे जाणते आहेत ते यास नक्कीच करतात. कपालभाती ही एक श्वास घेण्याची संतुलीत पध्दती आहे. याच्या सरावामुळे शरीरातील सर्व नकारात्मक तत्व निघुन जातात.
कसं करावं हे आसन?
दोन्ही पायांना आराम मिळेल अशा स्थितीत बसावे.
एक लांब श्वास घेवून श्वास सोडावा, श्वास घेण्यावर महत्व न देता श्वास सोडण्यावर ध्यान केंद्रित करावे.
श्वास घेतांना पोटातील आतडी फुगली पाहिजे व श्वास सोडतांना आतडी संकुचीत झाली पाहीजे.
यास एकावेळी १० ते १५ वेळा नक्कीच करावे.
या काही गोष्टींची काळजी घ्यावी
या प्राणायामास एखाद्या विशेषज्ञाच्या देखरेखीखाली करावे. हळूहळू सरावाचा वेळ वाढवत न्यावा.उच्च रक्तदाबाच्या रोग्यांनी याचा सराव शक्यतो करू नये.यास शक्यतो सकाळीच करावे. रात्रीस करू नये.चक्कर येणे किंवा थकल्यासारखे वाटत असल्यास याचा सराव करू नये.
कपालभाती प्राणायाम करण्याचे लाभ
अनेक लोक यास शरीरास आराम देण्यासाठीही करतात.
काही लोक आपले वजन कमी करण्यासाठीही याचा अभ्यास करतात.
याच्या नियमीत सरावाने श्वसन तंत्र सुरळीत होते.
फुफ्फुसाचे संक्रमणही यामुळे कमी होते तसेच एलर्जीक तत्व शरीराबाहेर टाकले जातात.
याच्या सरावामुळे डायाफाम लवचीक बनते त्याची कार्यदक्षता ही वाढविली जाते.
शरीरातील खालच्या अंगांना रक्ताचा पुरवठा नियमीत केला जातो.
फफ्फुसाचे कार्य सुरळीत चालते तसेच त्यातील संक्रमणही दुर होते.
शरीरात जास्त प्रमाणात आॅक्सीजन पुरवला जातो त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढविली जाते.
या प्राणायामामुळे कूंडलिनी जागृत होतात तसेच मन एकाग्र होते.