International Yoga Day 2022: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट योगासन, जाणून घ्या योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:56 AM2022-06-21T10:56:12+5:302022-06-21T10:56:42+5:30

International Yoga Day 2022: जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर वेगवेगळी योगासने आहेत. त्यातील एक खास योगासन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हलासन करता येईल.

International Yoga Day 2022 : Plow pose or halasana yoga for belly fat loss at home | International Yoga Day 2022: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट योगासन, जाणून घ्या योग्य पद्धत

International Yoga Day 2022: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट योगासन, जाणून घ्या योग्य पद्धत

googlenewsNext

International Yoga Day 2022: 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या दिवशी जीवनात योगासनांचं आरोग्यासाठी किती महत्व आहे हे सांगितलं जातं. या खास दिवसापासून तुम्हीही तुमचा योगाचा प्रवास सुरू शकता. योगा शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर वेगवेगळी योगासने आहेत. त्यातील एक खास योगासन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हलासन करता येईल. हलासन थेट पोटाला टार्गेट करतं आणि फॅट बर्न करतं. 

कसं करतात हलासन?

- जमिनीला पाठ टेकवून चटईवर पडा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला सरळ चिकटवून ठेवा. तळहात जमिनीवर दाबा.

- उत्तानपादासनासारखे दोन्ही पाय हळूहळू आणि सावकाश वर उचलून आकाशाच्या दिशेने सरळ करून थांबा.

- श्वास सोडून कंबर उचला. पाय डोक्याकडे मागे घ्या. दोन्ही पाय सावकाश जमिनीवर आणा.

- हात मुडपून दोन्ही हातांची मिठी डोक्याखाली ठेवा किंवा दोन्ही हात जमिनीवर सरळ पसरवा.

- पाय सरळ आणि जुळवून असू द्या. त्यांच्यामध्ये सांध ठेवू नका. या आसनाची ही अंतिम अवस्था आहे.

- या स्थितीत श्वासोच्छवास सामान्य ठेवा. या स्थितीत शक्य तितका वेळ आरामात थांबा. थांबण्याचा वेळ हळूहळू वाढवा.

- शेवटी हात सोडा. त्यांना दोन्ही बाजूंस जमिनीवर ठेवा. सावकाश श्वास घ्या.

हलासनाचे फायदे

पोटावरील चरबी कमी करण्यासोबतच हलासन करण्याचे आणखीही काही फायदे आहेत. हलासन केल्याने मेटाबॉलिज्म चांगलं होतं. याने पोटासंबंधी समस्या दूर होतात. हलासन केल्याने मसल्ससोबतच मेंदूलाही आराम मिळतो.

- हार्निया आणि मधुमेहाकरिता हे उपयुक्त आसन आहे.

- अपचनाचा विकार कमी होऊन भूक चांगली लागते.

- पोट, पित्ताशय आणि पाणथरी यातील रोगांवर गुणकारी आहे.

- पाठीचा कणा सशक्त आणि लवचिक होण्यास मदत होते.

- पुठ्ठे आणि पोट यांची अवास्तव वाढ कमी होण्यास हलासनाचा चांगला उपयोग होतो.

सुरवातीला हलासन करणं अवघड होईल, त्यामुळे गडबड करू नका. सरावाने तुम्हाला हे सोपं होईल. हे करत असताना श्वासावर लक्ष द्या आणि पाय सरळ ठेवा. पाठ दुखू नये म्हणून जमिनीवर योगा मॅट ठेवा. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे योगासन करावं.

Web Title: International Yoga Day 2022 : Plow pose or halasana yoga for belly fat loss at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.