दिलासादायक! ओझोन गॅसने कोरोना विषाणू नष्ट होणार; जपानमधील तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या कसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:53 PM2020-08-28T18:53:42+5:302020-08-28T19:01:44+5:30

ओझोन गॅसच्या मदतीनं कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. या शोधाबाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे. 

Japan researchers says low concentrations of ozone gas can neutralise covid-19 particles | दिलासादायक! ओझोन गॅसने कोरोना विषाणू नष्ट होणार; जपानमधील तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या कसा

दिलासादायक! ओझोन गॅसने कोरोना विषाणू नष्ट होणार; जपानमधील तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या कसा

Next

कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या व्हायरसनं आतापर्यंत २ कोटी ४० लाख लोकांना संक्रमित केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २१ हजार पेक्षा जास्त लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. दरम्यान जपानच्या तज्ज्ञांनी आश्चर्यकारक दावा केला आहे. जपानी  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ओझोन गॅसच्या मदतीनं कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. या शोधाबाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे. 

वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार हा शोध जपानच्या फुजिता हेल्थ युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी लावला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमी घनता असलेला ओझोन गॅस (0.05 ते 0.1 पीपीएम) व्हायरसला नष्ट करण्यासाठी  प्रभावी ठरतो. कमी घनत्व असलेला ओझोन गॅसमुळे कोरोना विषाणूंचा प्रभाव ९० टक्क्यांनी कमी होतो. यासाठी वैज्ञांनिकांनी ओझोन जनरेटरचा वापर केला होता. ओझोन ऑक्सीजनच्या तीन परमाणूंपासून तयार झालेला गॅस आहे. हा अत्यंत विषारी गॅस आहे.

ओझोन वायूचा थर पृथ्वीला हानीकारक किरणांपासून वाचवतो. ओजोन गॅस हा माणसांसाठी नुकसानकारक असला तरी ओझोन गॅसचा निम्न स्तर माणसांसाठी सुरक्षित असतो. फुजिता हेल्थ युनिवर्सिटीचे प्रमुख शोधकर्ता ताकायुकी मुराता यांनी सांगितले की, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ओझोन गॅसचा वापर केला जाऊ शकतो. ओझोन गॅसच्या वापरानं कोरोना विषाणूंपासून लवकरता लवकर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. 1-6 पीपीएम च्या उच्च आद्रतेवर हा गॅस कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी प्रभावी आहे. 

प्रतीकात्मक तस्वीर

कोविड १९ च्या लक्षणांबाबत WHO नं दिली सूचना

कोरोना संक्रमणाची माहिती मिळण्यासाठी ज्या लोकांमध्ये  कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. अशा लोकांचीही चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. कोविड १९ च्या प्रसाराबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख मारिया वान केरखोवे (Head of Technology, Maria Van Kerkhove) यांनी एका संम्मेलनादरम्यान सांगितले की, कोरोना विषाणूंचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवं. 

ज्या  रुग्णांमध्ये  संक्रमणाची सौम्य लक्षणं  दिसत आहेत किंवा जराही लक्षणं  दिसत नसलेल्या रुग्णांचीही तपासणी करायला हवी. याआधीही अमेरिकेतील आरोग्य संस्थेनं आपल्या नियमांमध्ये बदल करत संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या ज्या लोकांमध्ये लक्षणं दिसत नाहीत अशा लोकांना चाचणी करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं होतं. 

अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राकडून(Centers for Disease Control and Prevention) स्थानिक आरोग्य अधिकारी वर्गाला सांगण्यात आलं की, संक्रमत व्यक्तीच्या आजबाजूला 1.8 मीटर परिसरात 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जी व्यक्ती संपर्कात आली आहे त्यांची तपासणी करणं अनिवार्य आहे. आता नवीन गाईडलाईन्सनुसार  संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणं दिसत नसतील तर चाचणी करणं अनिवार्य नाही. परिणामी संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे.

हे पण वाचा-

दिलासादायक! भारतात २०२१ च्या सुरुवातीला लस येणार; ४४० रुपयांना उपलब्ध होणार, तज्ज्ञांचा दावा

फुफ्फुसांच्या आजारांना लांब ठेवण्यााठी 'सेल्फ केयर टिप्स' ठरतील प्रभावी, नेहमी राहाल निरोगी

Web Title: Japan researchers says low concentrations of ozone gas can neutralise covid-19 particles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.