फक्त दोन मिनिटं.. आणि व्हा चिंतामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:23 PM2018-01-04T16:23:40+5:302018-01-04T16:24:35+5:30

आपण निराश होतो म्हणजे नेमकं काय होतं?

Just two minutes .. and be stress free! | फक्त दोन मिनिटं.. आणि व्हा चिंतामुक्त!

फक्त दोन मिनिटं.. आणि व्हा चिंतामुक्त!

googlenewsNext
ठळक मुद्देज्यावेळी आपण निराश झालेलो असतो, त्यावेळी आपल्या श्वासाची लांबी खूपच कमी झालेली असते.आपण छोटे छोटे श्वास घेत असतो. त्यामुळे आपली चिंता, काळजी आणखीच वाढते.चिंता कमी करायची असेल किंवा ज्यावेळी आपल्याला कसलं टेन्शन आलेलं असेल त्यावेळी खोलवर श्वास घ्या. आपल्या श्वासावर नियंत्रण आणा. तुमच्या ताणाचं प्रमाण खूपच कमी झालेलं असेल..

- मयूर पठाडे

आपल्याच शरीराकडे आपण कधी बारकाईनं लक्ष देतो का? आपल्या शरीरात केव्हा, काय बदल होतात, ते आपण टिपतो का? निदान त्याकडे आपलं लक्ष तरी जातं का?
आपण आनंदी असतो, तेव्हा आपल्या शरीरात काय बदल होतात, आपण उत्साही असतो म्हणजे आपलं शरीर नेमकं आपल्याला काय सांगत असतं? आपण दु:खी, निराश असतो, तेव्हा आपल्या शरीरात काय बदल होतात?
आपण जेव्हा आनंदी, उत्साहात असतो, तेव्हा सगळं उत्तम असतं, पण विशेषत: आपण ज्यावेळी निराशाजनक स्थितीत, चिंतेत, काळजीत असतो, तेव्हा आपण स्वत:ला जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? तसं जर केलं, तर आपल्या या चिंतेवर आपल्याला लगेच उपायही सापडू शकतो आणि आपली काळजी दूरही होऊ शकते.
ज्यावेळी आपण निराश झालेलो असतो, त्यावेळचं एक मुख्य लक्षण म्हणजे आपल्या श्वासाची लांबी खूपच कमी झालेली असते. आपण छोटे छोटे श्वास घेत असतो. त्यामुळे आपली चिंता, काळजी आणखीच वाढते. त्यामुळे आपली चिंता कमी करायची असेल किंवा ज्यावेळी आपल्याला कसलं टेन्शन आलेलं असेल त्यावेळी जाणीवपूर्वक आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. खोलवर श्वास घ्या. आपल्या श्वासावर नियंत्रण आणा. तुमच्या लक्षात येईल, आपल्या ताणाचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. हा प्रयोग जर आपण वारंवार केला, तर निराशा येण्याचं आपलं प्रमाण खूपच कमी होईल आणि आनंदी, सकारात्मक आयुष्याकडे तुम्ही आपोआपच वळाल.

Web Title: Just two minutes .. and be stress free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.