फिजिकल एक्टीव्हिटी आपण रोज करत असत असू तर शरीर निरोगी राहतं याबाबत कोणतीही शंका नाही. सध्याच्या काळात आजारांपासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर तर शरीराला व्यायाम करण्याची गरज असते. पण व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही तसंच शारीरिक हालचाल न झाल्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अलिकडेच झालेल्या संशोधनात जर तुम्ही रोज २० मिनिटं चालत असाल तर तुमची एक दोन नाहीतर तब्बल ७ प्रकारच्या कॅन्सरपासून सुटका होऊ शकते. दररोजचं चालणं तुम्हाला कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकतं.
जर्नल ऑफ क्लिनिकल ऑनकोलॉजी यात प्रकाशीत झालेल्या शोधासाठी तब्बल ९ ग्रुपसचा डेटा एकत्र करून संशोधन करण्यात आले होते. त्यात फिजिकल एक्टीव्हिटी आणि १५ प्रकारचे कॅन्सर यांचामधला संबंध स्पष्ट करण्यात आला होता. व्यक्तींनी दररोज चालण्याचा व्यायाम केल्यास शरीरास फायदा होतो. चालण्याने स्नायू मजबूत होतात. तसेच शरीरास अनेक फायदे होतात. व्यायामाचा हा प्रकार दररोज केल्याने शरीर तंदुरुस्त राहते.
या संशोधनात स्पष्ट करण्यात आलेल्या अहवालानुसार जर तुम्ही रोज २० मिनिट चालत असाल तर तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका नसतो. या व्यतिरीक्त ६ टक्के ब्रेस्ट कॅन्सर तसंच किडनी कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा कमी असतो. तसंच महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा टळतो.
जर तुम्ही नियमीत व्यायाम करत असाल तर तुमच्या कॅलरीज बर्न होतात. तसंच तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांपासून तुमचा बचाव होतो. कोणताही व्यायाम प्रकार करण्यास शक्य नसेल तर व्यायामाचा एक भाग म्हणून चालण्याची सवय लावून घ्या.चालण्यामुळे नैराश्यातून मुक्ती मिळते, पोटाचे विकार कमी होतात. यांसारखे अनेक फायदे शरीराला होतात. त्यामुळे दररोज कमीकमी २० मिनिटं तरी चालणं आवश्यक आहे.