Binge drinking म्हणजे काय आणि काय आहेत याने होणारे नुकसान?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 10:02 AM2019-08-22T10:02:18+5:302019-08-22T10:07:11+5:30
मद्यसेवनामुळे आरोग्याचं काय आणि कसं नुकसान होतं हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे मद्यसेवन न करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.
(Image Credit : www.orlandorecovery.com)
मद्यसेवनामुळे आरोग्याचं काय आणि कसं नुकसान होतं हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे मद्यसेवन न करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण बदलत्या लाइफस्टाईलमध्ये अलिकडे मद्यसेवनाचं प्रमाणही वाढलं आहे. अशात काही रिसर्च असंही सांगतात की, कमी प्रमाणात मद्यसेवन केलं तर त्याने फार नुकसान होत नाही. मात्र, याने नुकसान होतं हे नक्की. तसेच एकाचवेळी जास्त प्रमाणात मद्यसेवन करणंही आरोग्यासाठी फार जास्त नुकसानकारक ठरू शकतं.
(Image Credit : stlucianewsonline.com)
एकाचवेळी पाच किंवा त्यापेक्षा जास्त ड्रिंक्स सेवन करण्याला बिंज ड्रिंकिंग असं म्हटलं जातं. बिंज ड्रिंकिंगचा जो एक क्रायटेरिया आहे, त्यानुसार महिलांनी महिन्यातून एकदा एकाचवेळी चारपेक्षा अधिक ड्रिंक्स घेणे आणि पुरूषांनी पाच किंवा त्यापेक्षा जास्त ड्रिंक्स घेणे याला बिंज ड्रिंकिंग म्हटलं जातं.
(Image Credit : greatoaksrecovery.com)
वैज्ञानिकांनुसार, तरूण वयापासूनच जर जास्त मद्यसेवन केल्याने पुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सायकॉलॉजिकल समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बिंज ड्रिंकिंगमुळे लगेच निर्णय घेण्याची क्षमता, भावनांवर कंट्रोल न राहणे आणि अपघात या समस्यांचा धोका अधिक वाढतो.
(Image Credit : www.quitalcohol.com)
सर्वात जास्त समस्या तेव्हा होते जेव्हा लोकांना बिंज ड्रिंकिंगची सवय लागते. नियमित रूपाने बिंज ड्रिंकिंगला हेवी ड्रिंकिंग कॅटेगरीमध्ये ठेवलं जाऊ शकतं. अनेकांना असं वाटतं की, ते रोज मद्यसेवन करत नाहीत, केवळ वीकेंड्सला पितात, त्यामुळे त्यांना दारूड्या या कॅटेगरीमध्ये ठेवू नये. पण आठवड्यातून एकदाही जास्त ड्रिंक केलं तर याला बिंज ड्रिंकिंगच्याच कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं.