काय असतं एग्स फ्रीज करणं? एकता कपूरने ३६ व्या वर्षीच केलं होतं...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 02:31 PM2020-03-09T14:31:43+5:302020-03-09T14:48:40+5:30
एकता ही ४३ वर्षाची असताना सरोगरीच्या माध्यामातून आई झाली असली तरी वयाच्या ३६ साव्या वर्षी तिने आपले एग्स फ्रीज केले होते.
टेलिव्हिजन आणि चित्रपटातील प्रसिध्द निर्माती एकता कपूर आपलं करीअर आणि मदरहूडचा चांगला अनुभव घेत जीवन जगत आहे. एकता आपला १ वर्षाचा मुलगा यासह सिंगल मदर बनून राहते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर इतर मॉम्सप्रमाणे एकता सुद्धा आपल्या मुलासोबतचे फोटो टाकत असते. एकता ही ४३ वर्षाची असताना सरोगरीच्या माध्यामातून आई झाली असली तरी वयाच्या ३६ साव्या वर्षी तिने आपले एग्स फ्रीज केले होते.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ३६ व्या वर्षी एकता कपूरने आपले एग्स फ्रीज केले होते. तेव्हा एकता लग्न करणार आहे की नाही याबाबत साशंक होती. एकताच्या आईला असं वाटत होतं की एकताने आई होण्याचा अनुभव घ्यावा. आज आम्ही तुम्हाला एग्स फ्रीजिंग कसं आहे याबाबत सांगणार आहोत.
अलिकडच्या काळात करिअर ओरिएंटेड महिला मोठ्या प्रमाणावर एग्स फ्रीजिंगची प्रोसेस करत आहेत. ज्या महिलांना आपलं करिअर बनवून मग आपली एक फॅमिली तयार करायची आहे. पण वाढत्या वयात प्रेंग्नंसीशी निगडीत कोणतेही प्रोब्लेम्स होऊ नये असं वाटत असेल तर एग्स फ्रीजिंग ही अत्यंत सेफ प्रोसेस आहे. यामध्ये महिलांच्या गर्भाशयातून एक हेल्दी एग्सना काढून मेडीकल सुपरव्हिजनअंतर्गत ठेवलं जातं. त्यानंतर जेव्हा त्या महिलेला प्रेग्नंट व्हायचं असेल तेव्हा त्या एग्सना फर्टीलाईज करून महिलेच्या गर्भाशयात ट्रांसफर केलं जातं. यात आरोग्याला कोणताही प्रकारचा धोका नसतो.
तरिसुद्धा एग्स फ्रीज करण्याचा निर्णय घेत असताना सगळ्यात आधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण जसजसं महिलांचं वय वाढत जातं तसतसं गर्भाशयातील एग्स तयार करण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे महिला नैसर्गिक पद्धतीने बाळाला जन्म देऊ शकतं नाही. अनेक महिला जास्त वयाच्या असून सुद्धा त्यांना आई व्हायचं असतं. त्या कमी वयात आपले एग्स फ्रीज करण्याच्या पद्धतीचा वापर करतात. (हे पण वाचा-प्रियांका चोप्रा सुद्धा करते 'हे' इलेक्ट्रिक फेशियल, जाणून घ्या खासियत)
एग्स फ्रीजिंगच्या या प्रोसेस दरम्यान महिलांना कमी वयात एग्स फ्रीज करावे लागतात. कारण जसजसं वय वाढत जातं तसतसं फ्रीज होत असलेल्या एग्सची संख्या सुद्धा वाढत जाते. तज्ञांच्यामते जर ३४ वर्षाच्या स्त्रिला आपले एग्स फ्रीज करायचे असतील तर तिला १० एग्स फ्रीज करावे लागतील हेच जर ३७ वर्षाच्या महिलेला आपले एग्स फ्रीज करायचे असतील तर २० एग्स फ्रीज करावे लागतील आणि जर महिला ४२ वर्षाची असेल तर तिला ६१ एग्स फ्रीज करावे लागतील. असं केलं जातं कारण इम्प्लिमेंटेशनमध्ये कोणतीही समस्या निर्माण व्हायला नको. या प्रक्रियेचा रिजल्ट कितपत दिसून येणार आहे हे महिलेचं वय किती आहे यावर अवलंबून असतं. (हे पण वाचा-ऐन उन्हाळ्यातही त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी करा ऑईल वॅक्स....)