ऑफिसला जाण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त प्रवास करता? मग तुमच्यासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 03:28 PM2020-01-06T15:28:43+5:302020-01-06T15:28:57+5:30

तासाभरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना शारीरिक व्याधी होण्याचा धोका

long commute to work is bad for health | ऑफिसला जाण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त प्रवास करता? मग तुमच्यासाठी धोक्याची घंटा

ऑफिसला जाण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त प्रवास करता? मग तुमच्यासाठी धोक्याची घंटा

googlenewsNext

अनेक महानगरांमध्ये ऑफिस गाठण्यासाठी दररोज कर्मचाऱ्यांना मोठा प्रवास करावा लागतो. मुंबईसारख्या शहरांमध्ये तर पनवेल, कर्जत, कसारा, विरारसारख्या भागांमधून लोक कामासाठी येतात. गर्दीमुळे हा प्रवास दिवसागणिक धकाधकीचा होत आहे. याशिवाय या प्रवासाचे गंभीर परिणाम भविष्यात शरीरावर होऊ शकतात, असा धोक्याचा इशारा एका सर्वेक्षणातून देण्यात आला आहे. जास्त काळ प्रवासात घालवणाऱ्यांना झोपेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आठवड्याला ४० तासांपेक्षा जास्त वेळ काम करणाऱ्या आणि दिवसाकाठी तासाभरापेक्षा जास्त काळ प्रवास करणाऱ्यांना थकवा येण्याचं प्रमाण २५ टक्के इतकं असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना थकव्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या व्यक्तींच्या शारीरिक हालचाली कमी होतात. त्यामुळे विविध व्याधी जडण्याचा धोका वाढत जातो. याशिवाय १६ टक्के लोकांना झोपेशी संबंधित आजार होण्याचादेखील धोका असतो. स्टॉकहोम विद्यापीठाच्या आणि हेलसिंकीमधल्या आरोग्य आणि कल्याण विभागाच्या जॅना हालोनेन यांनी ही माहिती दिली आहे. 

दिवसभरातला बराचसा कालावधी कामात आणि प्रवासात गेल्यानं कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांचं शरीर निष्क्रीय होत जातं आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी कराव्या लागणारे व्यायाम करणं ते टाळू लागतात. यामुळे शरीराशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यता वाढते. अनेकांचं दिवसभराचं वेळापत्रक त्यांच्या कामाच्या वेळापत्रकावरुन ठरतं. त्यामुळे ऑफिस आणि प्रवासासाठी लागणाऱ्या कालावधीचा थेट संबंध आरोग्याशी असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. 

यासाठी २००८ ते २०१८ या कालावधीत २२ हजार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. दहा वर्षांच्या कालावधीत दोनवेळा त्यांच्या कामाची, प्रवासाला लागणाऱ्या वेळेची, झोपेची, मद्यसेवनाची, धूम्रपानाची माहिती घेण्यात आली. याशिवाय त्यांचं बॉडी मास इंडेक्सदेखील विचारात घेण्यात आलं. याबद्दलचं सर्वेक्षण करताना सरासरी ४८ वर्षांच्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला. 
 

Web Title: long commute to work is bad for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.