पपई म्हणजे अनेक आरोग्यदायी फळांपैकी एक... निसर्गतः उष्ण असलेले हे फळ अरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने शरीरासोबतच त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदा होतो. पपईमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्व जसं अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. जे शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी उपयोगी ठरतात. पपईमध्ये लायकोपीनही मोठ्या प्रमाणात असतं, जाणून घेऊया आहारामध्ये पपईचा समावेश केल्याने होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे :
वजन कमी होण्यासाठी
पपईमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे बऱ्याच वेळापर्यंत पोट भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे तुम्ही ओव्हर इटिंगपासून दूर राहता. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पपई तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी
पपईमध्ये शक्तीशाली अॅन्टीऑक्सिडंट आढळून येतात. जसं कॅरोटिन्स, फ्लॅवोनॉएड्स, व्हिटॅमिन-सी इत्यादी. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी शरीरातं अनेक आजारांपासून रक्षण होतं.
डोळ्यांसाठी उत्तम
पपईमध्ये व्हिटॅमिनी ए मुबलक प्रमाणात आढळून येतं. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी जिजेनेरेट होण्यापासून बचाव होतो. त्याचबरोबर मेक्यूलर डिजेनरेशन यांसारख्या डोळ्यांच्या समस्यांपासूनही सुटका होते.
हाडांच्या मजबूतीसाठी
हाडांचे आरोग्य स्वस्थ आणि मजबूत ठेवण्यासाठी दररोज पपईचे सेवन करा. पपईचं सेवन शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी मदत करतं. यामध्ये अॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन-सी असल्यामुळे हे अर्थरायटिस यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी मदत होते.
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी
पपईमध्ये डायजेस्टिव एंजाइम्ससारखं पपेन असतं, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर यामध्ये असलेलं फायबर शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं.