CoronaVirus News: ...म्हणून भारतीयांना कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर आली वेगळीच माहिती
By कुणाल गवाणकर | Published: October 28, 2020 04:20 PM2020-10-28T16:20:42+5:302020-10-28T16:21:19+5:30
CoronaVirus News: वैज्ञानिक आणि औद्योगिक संधोधन केंद्राकडून संशोधन अहवाल प्रसिद्ध
पुरेशी स्वच्छता नसलेल्या आणि अस्वच्छ पाणी पुरवठा होत असलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा धोका कमी असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संधोधन केंद्रानं त्यांच्या अहवालातून याबद्दलचा दावा केला आहे.
धोका वाढला! कोरोना विषाणूनं शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधला
अल्प आणि अल्प मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना जिवाणूंमुळे फैलावणाऱ्या आजारांचा जास्त धोका असतो, असं सीएआयआरनं अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळेच अशा देशांमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. या प्रक्रियेला इम्युन हायपोथिसिस असं म्हटलं जातं. याउलट स्थिती प्रगत देशांमध्ये आहे. 'विकसित देशांमध्ये स्वच्छता असते. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी असतो. याचा प्रतिकूल परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर होतो. या कारणामुळेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढतं,' अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात निर्माण होताहेत अधिक अँटीबॉडी
रोगप्रतिकारशक्तीवर प्रतिकूल परिणाम करणारं सायटोकिन शरीरात तयार होत असल्याचं प्रमाण विकसित देशांमध्ये सर्वाधिक आहे. त्याचमुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण या देशांमध्ये अधिक आहे. भारतातील स्थिती याच्या अगदी विरुद्ध आहे. संसर्गाचा इतिहास असलेल्या राज्य आणि शहरांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचं प्रमाण अतिशय कमी असल्याचं आकडेवारी सांगते.
भय इथले संपत नाही! कोरोनाची पुन्हा लागण होण्याचा धोका, अँटीबॉडीबाबत संशोधकांचा दावा
कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रोगप्रतिकारशक्ती यांचा २५ निकषांवर अभ्यास केल्याची माहिती सीएसआयआरचे संचालक शेखर मांडेंनी दिली. 'अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष अतिशय विरोधाभासी आहेत. जीडीपी अधिक असलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. भारतातल्या अनेक भागांमध्ये पाळली जाणारी स्वच्छता विकसित देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका जास्त आहे. मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी लागणारी रोगप्रतिकारशक्तीदेखील जास्त आहे,' असं मांडेंनी सांगितलं.