Lung Cancer Awareness Month : 'ही' असू शकतात फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही दुर्लक्ष करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:09 PM2018-11-11T14:09:58+5:302018-11-11T14:11:18+5:30
नोव्हेंबर महिना 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' म्हणून साजरा करण्यात येतो. लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर. हा एक गंभीर आजार आहे.
नोव्हेंबर महिना 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' म्हणून साजरा करण्यात येतो. लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर. हा एक गंभीर आजार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (World Health Organization) केलेल्या एका सर्वेनुसार, जवळपास 7.6 मिलियन लोकांचा मृत्यू फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे होतो. हा आजार झाल्यास अनेक लक्षणं दिसून येतात. त्यातील सर्वत महत्त्वाचं लक्षण म्हणजे वारंवार येणारा खोकला. जर या खोकल्यावर उपचार करूनदेखील तो बरा नाही झाला तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्याने काही तपासण्या करून घ्या.
धुम्रपान करणाऱ्या आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना लंग कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. परंतु हा गंभीर आजार याव्यतिरिक्त इतरही अनेक कारणांमुळे होतो. फुफ्फुसांमध्ये होणारा कॅन्सर सुरुवातीला ओळखणं अशक्य असतं. कारण सुरुवातीला या आजाराची लक्षणं दिसून येत नाहीत. जाणून घेऊयात कोणती लक्षणं आहेत ज्यांमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार करणं शक्य होतं.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :
- जेव्हा तुम्ही श्वास घेता त्यावेळी जर शिटीसारखा आवाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आवाजामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरप्रमाणेच इतरही आजारांचा धोका असतो.
- जर तुम्हाला खोल किंवा लांब श्वास घेताना त्रास होत असेल तर हे फुफ्फुसांमध्ये घम जमा असण्याचं कारण असू शकतं. ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
- चेहरा आणि घश्यामध्ये सूज असणंही लंग कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर अचानक घसा किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- कॅन्सर वाढल्याने सांधेदुखी, पाठ आणि खांदेदुखीचाही त्रास होतो. अनेकदा हाडं फ्रॅक्चरही होतात.
- जर तुम्हाला छातीत दुखण्यासोबतच पाठ आणि खांदेदुखीचाही त्रास सतावत असेल तर दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.
- कफ झाला असेल आणि खूप औषधं घेऊनही तो बरा होत नसेल. तर हे संक्रमण असू शकतं. याव्यतिरिक्त कफ संबंधातील इतर समस्या म्हणजे थुंकीतून रक्त पडतं असेल तर वेळीच तपासणी करून घ्या.
- फुफ्फुसांच्या कॅन्सरचा परिमाण मेंदूवरही होतो. अशा परिस्थितीमध्ये जर सतत डोकेदुखीचा त्रास सतावतो.
- अनेकदा शरीरातील कॅल्शिअमची मात्रा अधिक होते. ज्यामुळे रक्त गोठण्यास सुरुवात होते. हे देखील लंग कॅन्सर होण्याचं एक कारण असू शकतं.