दवाखान्यात जाण्याची वेळ येण्याआधी; 'या' घरगुती उपायांनी फुफ्फुसांना ठेवा संक्रमणापासून लांब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 05:33 PM2020-06-14T17:33:29+5:302020-06-14T17:37:55+5:30
फुफ्फुसांना चांगले ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात ऑक्सिजन तसंच जीवनशैली चांगली ठेवणं गरजेचं आहे.
(image credit- molecular medicine israel, 808novap)
फुफ्फुसं माणसाच्या शरीरातील एक महत्वपूर्ण भाग आहे. फुफ्फुसं चांगली असतील तर दीर्घकाळपर्यंत व्यक्ती निरोगी राहू शकते. पण धावपळीच्या जीवनात अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं याचा नकारात्मक परिणाम शरीरावर पडत असतो. बदलतं वातावरण आणि हवेतील प्रदुषणामुळे फुफ्फुस लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी आधीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.
फुफ्फुसांना चांगले ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात ऑक्सिजन तसंच जीवनशैली चांगली ठेवणं गरजेचं आहे. घरात नेहमी साफ सफाई ठेवणं. आठवड्यातून तीनवेळा आपली रुम आणि इमारतीचा परिसर स्वच्छ करायला हवा. श्वासांमार्फत धुळ माती मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्यामुळे फुफ्फुसं खराब होण्याची शक्यता असते. जर आजूबाजूला स्वच्छता असेल तर शरीर चांगले राहते.
फॅटी एसिड्स अनेकांना ही नाव ऐकूनच भीती वाटते. फॅटी एसिड्स शरीरासाठी नुकसानकारक ठरत असते तसंच फुफ्फुसांचे फिटनेस मेटेंन ठेवण्यासाठी फॅटी एसिड्सची महत्वाची भूमिका असते. त्यासाठी, आहारात पनीर , दुध, अंडी, हिरव्या ताज्या भाज्या यांचा समावेश करायला हवा. फुफ्फुसं चांगली राहण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता.
असा तयार करा
तुळशीची पाने आणि आल्याचा काढा फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरेल. एका भांड्यात एक ग्लास गरम पाणी टाकून कमी आसेवर गॅसवर ठेवा. यात तुळशीची पानं, आल्याची पेस्ट, गूळ टाकून ५ मिनिटं उकळू द्या. जेव्हा या मिश्रणाला चांगली उकळी येईल तेव्हा हे मिश्रण ग्लासमध्ये टाका. हे तुम्ही दररोज थोडं थोडं सेवन करु शकता. या सिरपमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि शरीराचा वायू प्रदुषणाच्या प्रभावांपासून बचावही करेल.
याशिवाय आयुर्वेदिक चहाने तुम्ही फुफ्फुसांना निरोगी ठेवू शकता. त्यासाठी एका भांड्यात दूध टाकून ते कमी आसेवर गॅसवर ठेवा. नंतर त्यात हळद, आलं, काळी मिरी, लवंग आणि तुळशीची पाने टाका. ५ मिनिटं हे मिश्रण चांगलं उकळू द्या. नंतर यात मध टाका. हे दूध लहान मुलांसोबतच मोठ्यांसाठीही फायदेशीर आहे.
मोठ्या कुटुंबातील लोकांना कोरोनाचा धोका जास्त? जाणून घ्या अफवा आणि फॅक्ट्स
'या' अवयवांना सतत हात लावणं ठरू शकतं कोरोना संक्रमणाचं मोठं कारणं; 'अशी' घ्या काळजी