कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. साधा ताप, शिंका येणं, खोकला येणं अशा आरोग्याच्या लहान सहान तक्रारी उद्भवल्या तरी लोक आपल्याला कोरोना तर झाला नाहीये ना? असा विचार करून घसका घेतात. आता पावसाळा सुरू व्हायला काही दिवस उरले आहेत. त्यामुळे वातावरणात बदल होत जातात. परिणामी अंगदुखी, सर्दी, खोकला जाणवतो.
धुळीमुळे अॅलर्जी होऊन शिंका येतात. ज्या पदार्थांमुळे शरीर ही प्रतिक्रिया देतं त्याला अॅलर्जी म्हटलं जातं. त्यामुळे शक्य तेवढं धुळीपासून दूर रहा किंवा काळजी घ्या. सतत शिंका येत असल्यास त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. आज आम्ही तुम्हाला सर्दीच्या त्रासापासून लांब राहण्यासाठी उपाय सांगणार आहोत.
लसूण
लसूण आपल्या स्वयंपाकघरात सर्रास वापरला जातो. लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसूण कमी वेळात दूर करतं.
लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो, खरं पाहता लिंबाच्या आणि मधाच्या सेवनाने तुम्हाला दुहेरी फायदे मिळतात. सकाळी उठल्यानंतर पाण्यासोबत याचे सेवन केल्यास लठ्ठपणा दूर होतो. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होते आणि सर्दी खोकल्याचा त्रासही कमी होतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
तुळस आणि आलं
सर्दी-खोकल्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.
चहा
चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं बारीक करून घ्या आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं. त्यामुळे घश्याला शेक मिळून तुमची सर्दी, खोकल्याची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय १५ दिवस आवळ्यांचा रस नियमित प्यायल्यास शिंका येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
कोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा
रणरणत्या उन्हाळात व्हायचं नसेल आजारांचं शिकार; तर 'असा' करा आरोग्याचा सांभाळ