High Blood Sugar ने हैराण आहात? लगेच या झाडाची पाने खाणं सुरू करा, मिळेल फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 11:07 AM2024-02-14T11:07:09+5:302024-02-14T11:07:51+5:30
रोज कडूलिंबाची काही पाने खाल्ल्याने हाय ब्लड शुगरसारखी समस्या दूर करण्यास मदत मिळते.
निसर्गाने आपल्याला अशा अशा गोष्टी दिल्या आहेत ज्यांचा वापर स्वत:ला निरोगी आणि फीट ठेवण्यासाठी करू शकतो. कडूलिंबाचं झाड त्याचं एक मोठं उदाहरण आहे. या झाडाची साल, पाने, फांद्या सगळ्याच औषधी म्हणून वापरल्या जातात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, रोज कडूलिंबाची काही पाने खाल्ल्याने हाय ब्लड शुगरसारखी समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ ही पाने आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरतात.
ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात
कडूलिंबाच्या पानांमध्ये अॅंटी-हायपरग्लायसेमिक तत्व असतात जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. NCBI वर प्रकाशित एका रिसर्चनुसार, कडूलिंबाची पाने हायपोग्लाइसेमिक प्रभाव दाखवतात, जी ब्लड शुगर कमी करण्याची एक प्रक्रिया आहे.
डायबिटीसवर उपाय
बरेच लोक कडूबिलांच्या पानांकडे डायबिटीसचं औषध म्हणूनही बघतात. कडूलिंबाची पाने इन्सुलिन तयार करणारे सेल्स हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. परिणामी शरीरात ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतं आणि डायबिटीसच्या रूग्णांना याचा फायदा मिळतो. हेल्थ एक्सपर्ट्स मानतात की, जर सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची 4 ते 5 पाने खाल्लीत तर आरोग्य चांगलं राहतं.
रक्त शुद्ध होतं
कडूलिंबामध्ये असे औषधी गुण असतात जे शरीरातील रक्त शुद्ध करतात. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. जर रक्त शुद्ध राहिलं तर तुम्हाला कोणते आजारही होणार नाहीत.