ब्रेस्ट कॅन्सरचं निदान आता लवकर होणार, गुगलने तयार केलं फास्ट काम करणारं नवं तंत्रज्ञान....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 09:50 AM2020-01-03T09:50:34+5:302020-01-03T09:57:38+5:30
ब्रेस्ट कॅन्सरची माहिती रेडिओलॉजिस्ट लावू शकतील अथवा नसेल, पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ब्रेस्ट कॅन्सरची माहिती त्याच्या सुरूवातीच्या लक्षणांवरूनच मिळवू शकतं.
ब्रेस्ट कॅन्सरची माहिती रेडिओलॉजिस्ट लावू शकतील अथवा नसेल, पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ब्रेस्ट कॅन्सरची माहिती त्याच्या सुरूवातीच्या लक्षणांवरूनच मिळवू शकतं. असं आमचं नाही तर गुगलचं मत आहे. कंपनीने दावा केला आहे की, कंपनीकडून एक असं एआय(आर्टिफिशिअल इंजेलिजन्स) मॉडल विकसित केलंय, ज्याने ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे संकेत आधीच माहीत करून घेता येतील.
कंपनीकडून त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, टेस्टींगदरम्यान समोर आले की, ६ ह्यूमन रेडिओलॉजिस्टची तुलना एआयने फार सहजपणे आणि चांगल्या प्रकारे रूग्णातील ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांना ओळखण्यात यश मिळवलं. गुगल या विषयावर त्यांच्या युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेटच्या क्लिनिकल रिसर्च पार्टनर्ससोबत मिळून गेल्या दोन वर्षांपासून अभ्यास करत आहे. कंपनीने याबाबत काही ठोस पुरावे असल्याचाही दावा केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एआय मॉडलला ट्रेन्ड अॅन्ड ट्यून्ड केलं गेलं होतं. यादरम्यान यात कॅन्सरची माहिती मिळवण्यासाठी वापरलेल्या स्तनांचा एक्स-रे आणि मेमोग्राम डेटा फीड केला गेला होता. हा डेटा यूकेतील ब्रेस्ट कॅन्सरच्य ७६ रूग्णांचा आणि यूएसमधील १५ हजार रूग्णांना होता. कंपनीकडून असंही सांगण्यात आलं आहे की, डेटा रिकगनाजेशन दरम्यान एआयला टेस्ट करण्यासाठी ज्या फॉल्स डेटाची वापर केला गेला, एआयने फार हुशारीने त्यांना ओळखून वेगळं केलं.
असं असलं तरी Google चा अल्गोरिदम रेडिओलॉजिस्टला बदलण्याची आवश्यकता नाही. ब्रेस्ट कॅन्सरबाबत गेल्या वर्षी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतात प्रति २.१८ लाख लोकसंख्येसाठी केवळ एक रेडिओलॉजिस्ट उपलब्ध होता. अशात अभ्यासकांच्या टीम आशा व्यक्त केली आहे की, एआयने हा गॅप भरून काढण्यास मदत होऊ शकेल.