कोरोना व्हायरसचं संक्रमण जगभरात वेगाने पसरत आहे. भारत, अमेरिका, ब्रिटेन, ब्राझिल आणि रुसमध्ये कोरोनाच्या माहमारीने अनेक लोक प्रभावीत झाले आहेत. भारतासह अनेक देशातील कंपन्या कोरोना व्हायरसवर लस किंवा औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रेमडीसीवीर, डेक्सामेथॅसोन, फॅबिफ्लू यांसारख्या औषधांना कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी मान्यता मिळाली आहे. आता शरीरात कोरोना व्हायरसची संख्या वाढण्यापासून रोखण्यासाठी नवीन औषधाचे नाव समोर येत आहे. या औषधाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रुसची फार्मा कंपनी आर-फार्मा(Russia Pharm) ने कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी नवीन औषध तयार केले आहे. हे एक एंटी व्हायरल औषध आहे. या औषधाचं नाव कोरोनाविर असे आहे. क्लिनिकल ट्रायलनंतर या औषधांच्या वापर कोरोना रुग्णांवर करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. आर-फार्मा(Russia Pharm) कंपनीने दावा केला आहे की कोरोनाविर हे औषध व्हायरसचं रेप्लिकेशन रोखण्यासाठी म्हणजेच व्हायरसची संख्या वाढण्यापासून रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
कोरोना व्हायरसचा शिरकाव शरीरात झाल्यानंतर संख्या झपाट्याने वाढू लागते. या कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविर ही देशातील पहिले असे औषध आहे. जे कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी प्रभावी ठरू शकते. क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध घेत असलेल्या रुग्णांच्या शरीरात सकारात्मक बदल झालेले दिसून आले. इतर थेरेपी आणि कोरोनाविर हे औषध घेत असलेल्या रुग्णांची तुलना केली असता कोरोनाविर या औषधामुळे रुग्णांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हे औषध कोरोना व्हायरसच्या लक्षणांना ओळखून व्हायरसला टार्गेट करते. कोरोनाविर घेत असलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं कमी झालेली दिसून आली. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील देशाचे प्रयत्न सुरू आहेत. भारत आणि अमेरिकेतील काही कंपन्या मिळून आयुर्वेदिक औषधांवर लवरकरच परिक्षण सुरू करणार आहेत.
कोरोनामुळे आतापर्यंत 562,888 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 12,630,886 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 8,20,916 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
coronavirus: सिप्लाने बनविले कोरोनावरील जगभरातले सर्वात स्वस्त जेनेरिक औषध