कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यांपासून कहर केला आहे. लसीकरणाला अनेक देशांमध्ये सुरूवात झाल्यानं लोकांच्या मनातील भीती काही प्रमाणात कमी झाली होती. पण ब्रिटनमध्ये आता कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन सापडल्यामुळे सर्वत्र पुन्हा लोक चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचं नवीन रूप अधिक संक्रामक ठरू शकतं अशी माहिती तज्ज्ञांनी दिली होती. भारतातही या नवीन स्ट्रेनच्या प्रसाराला रोखण्यासाठी मोठी पाऊल उचलण्यात आली आहेत. दरम्यान केंद्र सरकारनं याबाबत अधिक माहिती दिली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढू लागली आणि याचं कारण म्हणजे कोरोनाचं नवं रूप असल्याचं सांगितलं जातं आहे. यूकेमध्ये SARS-CoV-2 चा जो नवा स्ट्रेन दिसून आला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे. पण कोरोनाव्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन?
इंडिया टुडेशी बोलताना चेन्नई येथील आयसीएमआर एपिडेमिओलॉजी विभागाचे संस्थापक-संचालक डॉ मोहन गुप्ते यांनी याबाबत माहिती दिली आहे. यूकेमध्ये विषाणूचा प्रसार झपाट्याने झाल्यानंतर आता विषाणूचा नवीन स्ट्रेन सापडला. यामुळे साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी चालू असलेले प्रयत्न निरर्थक ठरतील का? असं त्यांना विचारल्यानंतर डॉ. गुप्ते म्हणाले की, ''20 सप्टेंबर रोजी दक्षिण इंग्लंडमध्ये व्हायरसचा नवीन स्ट्रेन सापडला.
Coronavirus : कोरोना व्हायरसच्या नव्या 'सुपरस्प्रेडर' स्ट्रेनबाबत WHO चं काय म्हणणं आहे?
त्याचवेळी संपूर्ण जगभरात झपाट्याने कोरोनचा प्रसार वाढायला सुरूवात झाली. व्हायरसच्या नवीन स्ट्रेनच्या जीनोमध्ये एकूण १७ बदल झालेले दिसून येत आहे. हा खूप मोठा बदल आहे. जो माणसांसाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळेच संक्रमणाची तीव्रताही वाढत आहे. त्यामुळे व्हायरस ७० टक्क्यांनी अधिक क्षमतेने पसरू शकतो. ''
खोटं बोलून विमानात बसणं कोरोना रुग्णाला महागात पडलं; एका तासाच्या आत गमावला जीव
पुढे त्यांनी सांगितले की, ''नवीन स्ट्रेन केवळ ब्रिटनमध्येच असावा अशी उच्च शक्यता आहे कारण तो व्हायरस युरोपच्या इतर भागात आढळलेला नाही. कोरोना विषाणू इन्फ्लूएन्झापेक्षा बराच स्थिर आहे. विषाणूचा एक नवीन स्ट्रेन नक्कीच भारतात येऊ शकतो कारण जागतिक स्तरावर संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे.''नव्या विषाणूचा भारतावर किती परिणाम झाला याचा तपास केला जाणार आहे. भारतातील सद्यस्थितीबद्दल भाष्य करताना गुप्ते म्हणाले की, भारतात कोरोनाच्या केसेसमध्ये लक्षणीय घट झाली आहे. भारतात रुग्णांची वाढ आणि संक्रमणाची तीव्रता यांचे प्रमाणही खूप कमी आहे.