लहान मुलांनी घराबाहेर जाऊन खेळणं आवश्यक; नव्या रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:25 PM2019-02-05T15:25:42+5:302019-02-05T15:26:21+5:30

सध्याच्या संगणाकाच्या युगामध्ये मुलंही सतत कंम्प्यूटर गेम्स आणि त्यावर इतर अनेक गोष्टी करण्यामध्ये बीझी असतात. नाहीतर अभ्यासाच्या वाढत्या ताणामुळे त्यांना खेळण्यासाठी वेळ देता येत नाही.

New research says it is very important for children to play outside home | लहान मुलांनी घराबाहेर जाऊन खेळणं आवश्यक; नव्या रिसर्चमधून खुलासा

लहान मुलांनी घराबाहेर जाऊन खेळणं आवश्यक; नव्या रिसर्चमधून खुलासा

Next

सध्याच्या संगणाकाच्या युगामध्ये मुलंही सतत कंम्प्यूटर गेम्स आणि त्यावर इतर अनेक गोष्टी करण्यामध्ये बीझी असतात. नाहीतर अभ्यासाच्या वाढत्या ताणामुळे त्यांना खेळण्यासाठी वेळ देता येत नाही. कधी कधी तर पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं पुरती दबून जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? मुलांच्या शारीरिक विकासासाठी त्यांनी घरातून बाहेर पडून इतर मुलांसोबत खेळणं अत्यंत आवश्यक आहे. एका नव्या रिसर्चमधून खुलासा करण्यात आल्यानुसार, मुलांना घरातून शाळेत पाठविणाऱ्या पालकांना हे माहीत असतं की, मुलांना एकत्र खेळण्यात येणारे खेळांमध्ये व्यस्त ठेवलं तर ते फिट आणि अ‍ॅक्टिव्ह राहतात. परंतु, लहान मुलांपेक्षा तरूणांना जास्त गरज असते. 

राइस यूनिवर्सिटीची लॉरा कबीरी यांच्यासोबतच्या सर्व संशोधकांनी सांगितले की, खरं तर हे समजणं फार कठिण आहे की, दररोज कितपत शारीरिक हालचाल होणं आवश्यक असतं. संशोधकांनी असं सांगितलं की, पालकांनी आपल्या मुलांना प्रतिदिन शारीरिक हालचालिंसाठी म्हणजेच, मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करणं गरजेचं असतं. 

कबीरी यांनी सांगितले की, पालकांना असं वाटतं की, जोपर्यंत त्यांना आपली मुलं शारीरिक परिश्रम करताना, जोरात श्वास घेताना किंवा घाम गाळताना पाहत नाहीत तोपर्यंत मुलं योग्य तेवढ्या शारीरिक हालचाली करत नाहीत. त्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली होण्यासाठी त्यांनी घारतून बाहरे म्हणजेच, मोकळ्या मैदानात, बागेमध्ये इतर मुलांसोबत खेळण्यासाठी पाठवा किंवा त्यांना सायकल चालवायला शिकवा. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO), मुलांना एका दिवशी साधारणतः तासाभरासाठी एरोबिक एक्सरसाइझ करण्याची सवय लावा. परंतु इतर काही संशोधनांमधून असं सिद्ध झालं की, मुलं जेव्हा एकत्र खेळतात. त्यावेळी त्यांच्या फक्त 20 ते 30 मिनिटांच्या खेळातूनच त्यांच्या शरीराचा आवश्यक तेवढा व्यायाम होतो. त्यामुळे मुलांच्या शारीरिक विकासासाठी त्यांना घरामध्ये न ठेवता इतर मुलांसोबत खेळायला पाठविणं अत्यंत आवश्यक आहे. 

जर्नल ऑफ फंक्शनल मोफरेलॉजी अ‍ॅन्ड किनेसिओलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनासाठी संशोधकांनी आपल्या घरातच बसून अभ्यास करणाऱ्या 10 ते 17 वर्षाच्या 100 मुलांवर संशोधन केलं. 

Web Title: New research says it is very important for children to play outside home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.