खूप प्रयत्न करूनही येत नाही शांत झोप, तर करा 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 07:02 PM2019-05-23T19:02:46+5:302019-05-23T19:15:47+5:30
व्यायाम करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशी ठरतं. यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? व्यायामाचा संबंध फक्त आपल्या शारीरिक आरोग्यावर नाही तर झोपेसोबतही असतो.
व्यायाम करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशी ठरतं. यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? व्यायामाचा संबंध फक्त आपल्या शारीरिक आरोग्यावर नाही तर झोपेसोबतही असतो. असं आम्ही सांगत नसून काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे. एका नव्या संशोधनातून असा दाव करण्यात आला आहे की, जे तरूण फिजिकली अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी असतात. ते एक्सरसाइज न करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त वेळ आणि उत्तम पद्धतीने झोप घेतात.
एक्सरसाइज केल्याने रात्री 10 मिनिटं जास्त झोपतात
सायन्टिफिक रिपोर्ट्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये संशोधनकर्त्यांना असं आढळून आलं की, अशा तरूण व्यक्ती ज्या प्रत्येक तासाला काही जास्त परिश्रमाची कामं करतात, ते रात्री 18 मिनिटं लवकर, 10 मिनिटं जास्त आणि एक टक्के शांत झोप घेतात. पेन स्टेटच्या डेटा साइंटिस्त लिंडसे मास्टर म्हणतात की, 'शांत झोप येणं हे तरूणपणी अत्यंत अवघड असतं. कारण या दरम्यान teensची झोप क्लासरूम परफॉर्मन्स, स्ट्रेस आणि इटिंग बिहेवियरमुळे डिस्टर्ब असते. याच गोष्टींवर हा रिसर्च लक्ष केंद्रित करतो. जर तरूण मुलांना प्रत्येक दिवशी जास्त एक्सरसाइज करण्यासाठी प्रोत्साहित केलं गलं तर रात्री त्यांना शांत झोप मिळण्यासाठी मदत होते.
दिवसभरात आळस केल्याने रात्री झोप येत नाही
संशोधनातून सिद्ध झालेले सर्व निष्कर्ष दिवसभरात जर तरूण निष्क्रीय राहत असतीस तर रात्री त्यांना शांत झोप लागत नाही. संशोधनमध्ये सहभागी झालेले प्रतिस्पर्धी जेव्ह दिवसभरामध्ये जास्त वेळेसाठी निष्क्रिय असतात. ते रात्रीच्या वेळी लवकर जोपतात आणि सकाळी उशीरा उठतात. पण त्यांची झोप पूर्ण होत नाही. म्हणजेच फिजिकल अॅक्टिव्हीटी आणि झोपेमध्ये संबंध असल्याचे स्पष्ट होते.
वयाच्या 15व्या वर्षी 417 लोकांना सहभागी करण्यात आलं होतं
संशोधनासाठी संशोधकांनी 417 लोकांना सहभागी केलं होतं. जेव्हा या व्यक्ती 15 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांना एक्सीलेरोमीटर्स देण्यात आले होते. जे त्यांच्या मनगटावर आणि हिप्सवर बांधण्यात आले होते. जे एक आठवड्यापर्यंत त्यांची फिजिकल अॅक्टिव्हीटी आणि झोप यांच्यावर लक्ष ठेवण्यातं काम करत होते. या संशोधनाचा उद्देश हाच होता की, सहभागी झालेल्या लोकांकडून त्यांच्या वागणूकीबाबत विचारण्याऐवजी त्यांच्या शारीरिक हालचालिंब आणि झोपेवर लक्ष ठेवणं.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.