स्ट्रेस म्हणजेच, तणाव आणि चिंता यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. परंतु, आता वैज्ञानिकांनी स्ट्रेसच्या एका अशा कॅटेगरीचा शोध लावला आहे, ज्यामुळे व्यक्तीचं आयुष्य कमी नाही तर वाढू शकतं. आश्चर्य वाटलं ना?, कारण आतापर्यंत आपण तणावामुळे आरोग्याच्या उद्भवणाऱ्या समस्यांबाबतच ऐकलं होतं. पण आता संशोधकांनी तणाव आयुष्य कमी करत नसून वाढवत असल्याचा दावा केला आहे. यामुळे व्यक्तीमध्ये वाढणाऱ्या वयाची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याचे देखील संशोधकांनी सांगितलं आहे.
उंदरांवर करण्यात आलं तणावाच्या प्रभावाचं संशोधन
अमेरिकेतील ह्यूस्टन मेथडिस्ट रिसर्च इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी, काही छोट्या किटकांमध्ये आणि उंदरांमधील तणावाच्या प्रभावाचा अभ्यास केला. यीस्टच्या प्रकरणांमध्ये संशोधकांना, स्ट्रेसच्या प्रभावामुळे वाढत्या वयाच्या लक्षणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले. या तणावाला संशोधकांनी 'क्रोमॅटिन स्ट्रेस' असं नाव दिलं असून यामुळे एखाद्या सजीवाच्या डिएनएमध्ये बदल घडून आल्याचं दिसून आलं.
मानवामध्येही असू शकतो 'हा' तणाव
संशोधकांनी सांगितले की, उंदरांव्यतिरिक्त क्रोमॅटिन स्ट्रेस दुसऱ्या सजीवांमध्येही असतो. म्हणजेच, याचं अस्तित्व मानवांमध्येही दिसू शकतं. जर असं झालं तर हे मानवी शरीरामधील वाढत्या वयाच्या प्रक्रियेला संथ करणं आणि आयुष्य वाढविण्याच्या नवीन संभावना खुल्या करण्यासाठी मदत करतो.
टिप : वरील सर्व गोष्टी या संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही या फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाचीच शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.