Newborn twins gets covid19 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; नवजात जुळ्या चिमुकल्यांना कोरोनानं बनवलं शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 03:24 PM2021-04-02T15:24:56+5:302021-04-02T15:46:17+5:30
Newborn twins gets covid19 : तपासणी दरम्यान ही नवजात मुलं कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अलीकडेच गुजरातमधील वडोदरा येथून नवजात शिशुंना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. येथे कोरोना विषाणूची लागण होण्याच्या काही दिवस आधीच दोन जुळ्या मुलांनी जगात प्रवेश केला होता. सध्या या दोन्ही चिमुकल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. इतर राज्यातून गुजरातमध्ये कोरोनाचा प्रवेश होऊ नये म्हणून सरकारने गुरुवारपासून आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक केली आहे.
वडोदरामध्ये नवजात जुळे मुलं कोविड -१९ ची बळी ठरली आहेत. वडोदराच्या एसएसजी हॉस्पिटलमधील बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शील अय्यर यांच्या म्हणण्यानुसार, नवजात मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मुलांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान ही नवजात मुलं कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
गुरुवारी डॉक्टर म्हणाले की, ''अतिसार आणि डिहाड्रेशनमुळे मुलांना रुग्णालयातून सोडल्यानंतर 15 दिवसांनी परत आणले गेले. आम्ही सुरुवातीला संसर्ग होण्याच्या सर्व सामान्य शक्यतांकडे लक्ष दिले, परंतु नंतर आम्ही त्यांना कोविडची तपासणी केली, ज्यामध्ये त्यांचा अहवाल सकारात्मक आला. मुलांच्या पालकांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांनी कळवले आहे . आता त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.'' वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला
Www.covid19india.org च्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 3 लाख 10 हजार 108 रुग्ण संक्रमणाची नोंद झाली आहे. त्यापैकी 4 हजार 528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या 12 हजार 996 आहे. त्याचबरोबर 2 लाख 92 हजार 584 रूग्ण निरोगी झाल्यानंतर घरी परतले आहेत. त्याच वेळी, देशभरात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये पुन्हा एकदा गती मिळाली आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 23 लाख 2 हजार 118 रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यात सरकारने लसीकरणाची मोहिम वेगानं सुरू ठेवली आहे. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे