पान 7-सिंधुदुर्गात तापाचे 275 रुग्ण

By admin | Published: September 4, 2015 10:44 PM2015-09-04T22:44:58+5:302015-09-04T22:44:58+5:30

16 रुग्णांना घरी सोडले

Page 7- 275 cases of depression in Sindhudurg | पान 7-सिंधुदुर्गात तापाचे 275 रुग्ण

पान 7-सिंधुदुर्गात तापाचे 275 रुग्ण

Next
16
ुग्णांना घरी सोडले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात शुक्रवारी दिवसअखेर 275 रुग्ण हे साध्या तापाचे आढळून आले आहेत. यातील 45 रुग्ण हे लेप्टो व डेंग्यूसदृश आढळल्याने त्यांचे रक्त नमुने घेण्यात आले. मात्र, ते सर्व नमुने निगेटिव्ह आले. यातील 30 रुग्णांना उपचाराखाली ठेवण्यात आले असून, गुरुवारी दाखल केलेल्या 16 रुग्णांना शुक्रवारी घरी सोडण्यात आल्याचीही माहिती डॉ. योगेश साळे यांनी दिली.
कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील सान्वी व सोनवडे येथील निकेतन या दोन बालकांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्यानंतर जिल्?ात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही. आरोग्य यंत्रणा अलर्ट असून येत्या आठ दिवसांत स्वाईन फ्लूचे प्रमाण ओसरताना दिसून येईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी व्यक्त करत आज जिल्हाभरात साध्या तापाचे 275 रुग्ण आढळले असून, त्यातील 30 रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयांत दाखल करून घेतल्याचे सांगितले.
जिल्?ात सध्या डेंग्यू, स्वाईन फ्लूू, लेप्टो स्पायरोसीस या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. पाऊस व जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. स्वाईन फ्लूचा शिरकावही झाला होता. सान्वी नाईक व निकेतन धुरी या दोन बालकांचा स्वाईन फ्लूूमुळे मृत्यू झाला. त्यानंतर जिल्?ात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे डॉ. साळे यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)
महिलेचा मृत्यू
कणकवली तालुक्यातील साकेडी येथील मनाली प्रवीण राणे (वय 36) या विवाहितेचा फुफ्फुसे निकामी झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप येत असल्याने त्यांना पणजी येथे दाखल करण्यात आले होते. तेथून कणकवलीतील खासगी रुग्णालयात आणि नंतर कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले.
कुडाळात दोघांना डेंग्यू
कुडाळ तालुक्यातील तापसरीच्या साथीवर आरोग्य विभागाने काही प्रमाणात नियंत्रण मिळविले असले तरी अजूनही तापसरीच्या रुग्णांमध्ये वाढ होतच आहे. शुक्रवारी नेरूर येथील एका स्थानिकाला व कवठी गावातील एका परप्रांतीय कामगाराला डेंग्यू झाल्याची माहिती कुडाळ ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली आहे. शुक्रवारी, कवठी-चेंदवण येथील 81 परप्रांतीयांची तपासणी आरोग्य पथकाने केली. दरम्यान, लहान मुलांच्या तापसरीचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: Page 7- 275 cases of depression in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.