न्यूमोनियापासून रक्षण करण्यासाठी 'हे' 4 उपाय ठरतील फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:14 PM2018-11-13T12:14:54+5:302018-11-13T12:16:44+5:30
न्यूमोनियाची लक्षणं लहान मुलांमध्ये जास्त जास्त दिसून येतात. पावसाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. न्यूमोनियाची प्रमुख दोन लक्षणं आहेत. पहिलं खोकला आणि दुसरं श्वास घेण्यास त्रास होणं ही आहेत.
न्यूमोनियाची लक्षणं लहान मुलांमध्ये जास्त जास्त दिसून येतात. पावसाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. न्यूमोनियाची प्रमुख दोन लक्षणं आहेत. पहिलं खोकला आणि दुसरं श्वास घेण्यास त्रास होणं ही आहेत. न्यूमोनिया झाला असल्यास सर्दी-खोकला आणि त्यानंतर ताप येतो. अनेकांना हा साधारण आजार वाटतो पण याकडे दुर्लक्ष करणं अनेकदा महागात पडू शकतं. न्यूमोनिया फुफ्फुसांमध्ये सूज आल्यामुळे होतो. जर हा आजार तीन महिन्यांपेक्षा लहान मुलांना झाला तर जास्त धोकादायक असतं. न्यूमोनिया अनेकदा बॅक्टेरिया, वायरस किंवा फंगल इन्फेक्शनमुळे होतो. वातावरण बदलामुळे, सर्दी झाल्यामुळे, फुफ्फुसांना दुखापत झाल्यास किंवा कांजण्यांमुळेही न्यूमोनिया होतो. पण योग्या उपचार आणि औषधांमुळे न्यूमोनिया बराही होतो.
न्यूमोनियाची लक्षणं :
- जोरात श्वास घेणं
- कफ आणि खोकला
- ओठांचा आणि नखांचा रंग पिवळा होणं
- उलट्या येणं
- छातीत आणि पोटात दुखणं
भारतामध्ये 2030 पर्यंत 17 लाखांहून जास्त बालकांचा मृत्यू झाल्याची शंका
ब्रिटनमधील एनजीओ 'सेव द चिल्ड्रन'च्या एका रिपोर्टनुसार, न्यूमोनियामुळे 2030पर्यंत भारतातील पाच वर्षांपैकी कमी वयाच्या 17 लाख आणि जगभरातील 1.1 कोटी बालकांचा मृत्यू होण्याची शंका वर्तवण्यात आली आहे. या आजारामुळे सर्वाधिक मृत्यू नायजेरिया, भारत, पाकिस्तान आणि कांगो या देशांमध्ये होऊ शकतात.
न्यूमोनियापासून असं करा बाळाचं रक्षण
रिपोर्टनुसार, यामधील एक तृतीयांश म्हणजेच 40 पेक्षा जास्त मृत्यू योग्य ते लसीकरण, उपचार आणि पोषण यामुळे टाळता येऊ शकतात. जगभरामधील बालकांचा मृत्यू होण्याचं कारण सर्वात जास्त आहे.
2016मध्ये निमोनियामुळे 880,000 बालकांचा मृत्यू झाला
2016मध्ये 880,000 मुलांचा या आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यातील जास्तीतजास्त मुलं ही दोन वर्षांपेक्षा कमी वयाची होती. या रिपोर्टनुसार, 2030पर्यंत या आजारामुळे जवळपास 10,865,728 बालकांचा मृत्यू होतो. सर्वाधिक 1,730,000 बालकांचा नायजेरीयामध्ये, 1,710,000 बालकांचा भारतात, 706,000 बालकांचा पाकिस्तानात आणि 635,000 बालकांचा कांगोमध्ये मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
न्यूमोनियापासून सुटका करण्यासाठी घरगुती उपचार :
1. हळद आणि लवंग
हळदीमध्ये असलेले अॅन्टीबायोटिक गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे शरीरातील आजार दूर होतात. न्यूमोनिया झाला असल्यास थोडीशी हळद कोमट पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्याचा लेप छातीवर लावल्याने आराम मिळेल. एक ग्लास पाण्यामध्ये 5 ते 6 लवंग, काळी मिरी आणि 1 ग्रॅम सोडा टाकून उकळून घ्या. आता हे मिश्रण दिवसातून 1 ते 2 वेळा घ्या.
2. लसणाची पेस्ट
लसणाच्या काही पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट तयार करा आणि रात्री झोपण्याआधी मुलांच्या छातीवर त्याचा लेप लावा. त्यामुळे छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होईल.
3. लसणाचे पाणी
लसणामध्ये बॅक्टेरियाशी लढण्याची क्षणता असते. त्याचप्रमाणे लसूण वायरस आणि फंगलसोबतही लढण्यास फायदेशीर असतो. लसणामध्ये शरीराचं तापमान कमी करणं, त्याचप्रमाणे छाती आणि फुफ्फुसांमधील कफ बाहेर टाकण्यासाठी फायदेशीर ठरते. लसूण गरम असल्यामुळे दिवसातून 3 ते 4 वेळा, दोन ते तीन चमचे घ्यावं. त्यामुळे न्यूमोनियापासून आराम मिळतो.
4. लाल मिरची
लाल मिरचीमध्ये कॅप्सासिन असतं. जे श्वासनलिकेतील कफ काढून टाकण्यासाठी मदत करतं. लाल मिरची बीटा-कोरटेनचाही चांगला स्त्रोत आहे. जवळपास 250 मिली पाण्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर मिक्स करा आणि थोडं लिंबाचा रस मिक्स करून त्याचं सेवन करा.