(Image Crdit : www.rd.com)
'द लॅंसेट' नावाच्या पत्रिकेत प्रकाशित एका अभ्यासानुसार, जपानमधील लहान मुलं जगात सर्वात निरोगी आणि आनंदी मुलं आहेत. सोबतच जपानमध्ये जन्माला येणारी मुलं जगातल्या दुसऱ्या मुलांच्या तुलनेत अधिक जास्त जगतात. कारण जपानमधील पालकांनी मुलांना पौष्टिक आहार देण्यासारख्या कठीण कामावर विजय मिळवला आहे. लहान मुलांच्या निरोगी भविष्यासाठी त्यांना बालपणापासूनच चांगला आहार मिळणे गरजेचे असते. जपानमधील पालकांनी आपल्या मुलांना योग्य आणि हेल्दी आहार खाऊ घालण्यात यश मिळवलं आहे. चला जाणून घेऊ जपानी पालकांच्या काही टिप्स ज्या तुम्ही वापरु शकता.
मुलांना नवीन टेस्ट विकसीत करु द्या
लहान मुलं एकसारखं जेवण करुन किंवा एकसारख्या टेस्टचे पदार्थ खाऊन लवकर कंटाळतात. त्यांची फूड हॅबिट वेळोवेळी बदलत असते. त्यामुळे त्यांना नवीन पदार्थ किंवा नवीन टेस्ट असलेले पदार्थ देणे गरजेचे आहे. एक्सपर्टनुसार, असे केल्याने लहान मुलांमध्ये हेल्दी डाएटबाबत आवड वाढत जाणार. सोबतच त्यांना नवीन टेस्ट करण्यात कधीच काही अडचण येणार नाही.
जास्त शिस्तही महागात पडते
लहान मुलं काहीही खात असले तरी ते त्याच्या शरीराला मानवलं पाहिजे यासाठी त्याने ते एन्जॉय करत खाणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना जर एखादी गोष्ट पसंत नसेल तर ती जबरदस्तीने त्यांना खायला देऊ नका. कधी कधी मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ द्यावे. खाण्याबाबत फार जास्त स्ट्रिक्ट होणेही चुकीचे ठरु शकते.
जेवण वाढण्याची पद्धत
लहान मुलांना जेव्हाही जेवण द्याल तेव्हा छोट्या प्लेटमध्ये द्यावे. त्यांना असं नको वाटायला की, त्यांना खूप जास्त जेवण वाढलंय आणि जेवण्याआधीच ते संपवायचं कसं याचं त्याला टेन्शन येऊ नये. त्यामुळे लहान मुलांना स्वत:च ताट वाढून घेण्याची सवय लावा. अशाने मुलांना जे आवडतं ते स्वत: घेऊन खातील. तसेच प्लेटही चांगली दिसावी जेणेकरुन लहान मुलांची भूक आणखी वाढेल.
परिवाराने एकत्र जेवण करावे
एका अभ्यासानुसार, लहान मुलांनी चांगला आरोग्यदायी आहार घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तसेच त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या रहाव्या तर सर्वांनी एकत्र जेवण करणे गरजेचे आहे. जेव्हा परिवारातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करतात तेव्हा मुलांमधील आणि पालकांमधील बॉंडींगही चांगलं होतं.