हिवाळ्यात वातावरणात गारवा पसरत जातो. त्याचा परीणाम आरोग्यावर होताना दिसून येत आहे. वातावरणात झालेल्या बदलाचा सगळ्यात जास्त परिणाम शरीरावर होत असतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण स्वेटर, मोजे, शाल यांचा वापर करत असतो. पण हिवाळ्यात महिलांना तसंच काही प्रमाणात पुरूषांना समस्या जाणवते ती म्हणजे सतत लघवी येण्याची. हिवाळा आल्यानंतर सगळ्यांनाच ही समस्या उद्भवत असते. खास करून संध्याकाळच्यावेळी थंडी जास्त वाजत असल्यामुळे लघवी येते. तर काहीवेळा पाण्याचं सेवन कमी केलं तरी सुद्धा लघवी लागण्याचा त्रास अधिक होतो. चला तर मग जाणून घेऊया असं का होतं.
वातावरणात बदल झाल्यामुळे हिवाळ्यात सगळ्यात जास्त लघवी येते. यामागे शास्त्रिय कारण आहे. तसंच काही नैसर्गिक घटकांचा परीणाम शरीरावर होत असतो. ही एका प्रकारची मानसीक स्थीती आहे. ज्यामुळे लघवी अनेकदा येते. हिवाळ्यात आपल्या शरीरातील तापमान कमी होत असतं. त्यामुळे हात कापायला लागतात. तसंच शरीर गारठतं.
रक्तवाहिन्यांवर सुद्धा प्रभाव पडत असतो. त्यामुळे दबाव वाढल्याने बदल होत असतात. याचा परीणाम किडनीवर होतो. यावेळी किडनीचे कार्य नेहमी जसे चालतं त्यापेक्षा अधिक कार्य कराव लागत असतं. ज्यामुळे युरीन जमा होण्याचं प्रमाण वाढत असतं. म्हणून हिवाळ्यात लघवी जास्त लागते. सतत लघवी होत असल्यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होत असते.
तज्ञांच्यामते जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. पण थंडीच्या वातावरणात जास्त लघवी येणे. हे हाइपोथर्मिया असल्याचं लक्षण असू शकतं. हा आजार असल्यास शरीर थरथरणे, श्वास घेण्यासाठी त्रास होणे अशी लक्षण दिसून येतात. तुम्हाला सुद्धा लघवी सतत लागण्याव्यतिरीरक्त जर काही त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.