पेनकिलर्सचा नियमित वापर धोकादायक, ७० हजार महिलांवर झालेल्या संशोधनातून समोर आली चिंता वाढवणारी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 09:25 AM2022-02-20T09:25:32+5:302022-02-20T09:26:02+5:30

Health News: बॉडी पेन म्हणजे अंगदुखीच्या समस्येपासून दिलासा मिळवण्यासाठी नेहमी पेनकिलर्स घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याविना वारेमाप पेनकिलर्स घेणे हे प्रकृतीसाठी किती धोकादायक ठरू शकते याची तुम्हाला कल्पनाही नसेल.

Regular use of painkillers is dangerous, according to research conducted on 70,000 women | पेनकिलर्सचा नियमित वापर धोकादायक, ७० हजार महिलांवर झालेल्या संशोधनातून समोर आली चिंता वाढवणारी माहिती

पेनकिलर्सचा नियमित वापर धोकादायक, ७० हजार महिलांवर झालेल्या संशोधनातून समोर आली चिंता वाढवणारी माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली - बॉडी पेन म्हणजे अंगदुखीच्या समस्येपासून दिलासा मिळवण्यासाठी नेहमी पेनकिलर्स घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याविना वारेमाप पेनकिलर्स घेणे हे प्रकृतीसाठी किती धोकादायक ठरू शकते याची तुम्हाला कल्पनाही नसेल. ७० हजार महिलांवर झालेल्या एका संशोधनामधून दररोज पेनकिलर्स घेण्याऱ्या महिलांमध्ये कानाशी संबंधित समस्या वाढवू शकतात.

बर्मिंघम अँड वुमन्स हॉस्पिटलच्या संशोधकांनी कंडक्ट स्टडीमध्ये दिसून आले की, पेनकिलर्सचा वारेमाप वापर करणाऱ्या महिलांमध्ये टिनिटस (कानाशी संबंधित समस्या) सामान्य प्रमाणाच्या तुलनेत २० टक्के अधिक असू शकते. संशोधनामधील प्रमुख लेखक डॉक्टर शेरॉन करहन यांनी सांगितले की, आमच्या संशोधनामध्ये दिसून आले की, वेदनादायी औषधांचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये टिनिटसचा धोका अधिक आहे. हे संशोधन जर्नल ऑफ जनरल इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाली आहे.

यामध्ये ए़डविल आणि टालेनॉलसारख्या पेनकिलर्सशिवाय NSAIDs आणि Aleve सारख्या अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रग्सची नावेही सांगण्यात आळी आहे. संशोधनानुसार आठवड्यामध्ये सहा किंवा सातवेळा एस्पिरिनचे डोस घेतल्यानेही टिनिटसचा धोका २० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. तज्ज्ञांनी सांगितले की, वेदनेमध्ये दिलासा देणाऱ्या औषधांना एवॉइड करण्यामुळे टिनिटसची लक्षणे कमी होतात की नाही, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मात्र संशोधनामध्ये कोल्ड, हँगओव्हवर, स्प्रेन किंवा दातदुखीमध्ये वापरण्यात येणारी पॅरासिथिमॉलसारखी औषधे घेण्यात येणार नाही, असा दावा करण्यात आलेला नाही. हे संशोधन केवळ पेनकिलर्सच्या दैनंदिन किंवा नियमित वापराकडे इशारा करत आहे. पेनकिलर्सच्या नियमित वापरामध्ये कुठलीही अडचण नाही आहे. २०१८ मध्ये ब्रिटिश टिनिटस असोसिएशनच्या अंदाजानुसार, उत्तराखंडमध्ये सुमारे ६० लाख लोक कानाशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. ब्रिटनमधील सुमारे १० टक्के लोकसंख्या यामुळे प्रभावित आहेत.

कानाशी संबंधित टिनिटसची समस्या कुठल्याही विशेष आवाजाशी जोडता येत नाही. कानामध्ये रिंगिंग, बजिंग, हमिंग, थ्रॉबिंग किंवा विविध प्रकारच्या आवाजांची जाणीव येणे याला टिनिटस म्हणतात.  

Web Title: Regular use of painkillers is dangerous, according to research conducted on 70,000 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.