Remdesivir production : देशात रेमडेसिविरच्या उत्पादनात ३ पटींनी वाढ; केंद्रीय मंत्र्यांची दिलासादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 06:17 PM2021-05-04T18:17:47+5:302021-05-04T18:29:56+5:30

Remdesivir production CoronaVirus News & Latest Updates : सर्वसामान्यांना हे औषध मिळवण्यासाठी खूप वणवण करावा लागली. दरम्यान रेमडेसिविरच्या उत्पादनाबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. 

Remdesivir production CoronaVirus : Remdesivir production cross 1 crore monthly says union minister | Remdesivir production : देशात रेमडेसिविरच्या उत्पादनात ३ पटींनी वाढ; केंद्रीय मंत्र्यांची दिलासादायक माहिती

Remdesivir production : देशात रेमडेसिविरच्या उत्पादनात ३ पटींनी वाढ; केंद्रीय मंत्र्यांची दिलासादायक माहिती

googlenewsNext

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांनाच गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागता आहे. ऑक्सिनजनची कमतरता, बेड्स उपलब्ध नसणं, औषधांचा तुटवडा यांमुळे जास्तीत जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी रेमडेसिविर या इंजेक्शनचा वापर केला जात असून गेल्या काही दिवसांपासून या औषधावरून चांगलंच रान पेटून उठलं.  तर सर्वसामान्यांना हे औषध मिळवण्यासाठी खूप वणवण करावा लागली. दरम्यान रेमडेसिविरच्या उत्पादनाबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. 

केंद्रीय रसायन व खते, राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी सांगितले की, ''देशात रेमडेसिविरचे उत्पादन दरमहा तिप्पट वाढल्यानं १.०५ कोटी झाले आहे आणि या अँटीव्हायरल औषधाची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.''

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

मांडवीया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'औषध निर्मितीची क्षमता ४ मे रोजी दरमहा १.०५ कोटी डोस पर्यंत ओलांडली आहे. जी या वर्षी १२ एप्रिलपर्यंत ३७ लाख डोस होती. अशा प्रकारे उत्पादन क्षमता जवळपास तीन पट वाढली आहे. या अँटीवायरल औषधाची निर्मिती सध्या देशातील ५७ मशिनरीद्वारे केली जात आहे. लवकरच आम्ही वाढत्या मागण्या पूर्ण करू.'

 कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

मंडाविया असेही म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार कोरोना विषाणूच्या साथीवर लढण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. देशातील कोविड संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्याआधी रेमेडीसवीरची मागणीही अनेक पटींनी वाढली आहे.'

Web Title: Remdesivir production CoronaVirus : Remdesivir production cross 1 crore monthly says union minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.