Cucumber benefits : काकडी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण याच्या डिटेल्स अनेकांना माहीत नसतात. कमी कॅलरी आणि पाणी भरपूर असल्याने काकडी वजन कमी करण्यासोबतच डिहायड्रेशनमध्ये फार प्रभावी आहे. बरेच लोक रोज जेवणासोबत कच्ची काकडी खातात. याशिवाय काकडीचा ज्यूस करून प्याल तर यूरिनरी इंफेक्शनपासून बचाव होऊ शकतो. पण हे सगळे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा काकडीचं योग्यवेळी सेवन कराल. चला जाणून घेऊन त्याबाबत...
काकडी खाण्याची योग्य वेळ
एक्सपर्ट सांगतात की, काकडी दिवसाच खाल्ली पाहिजे. याने मेटाबॉल्जिम मजबूत होतं. ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून बचाव करू शकता. यात 95 टक्के पाणी असते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होत नाही. तसेच याने इम्यूनिटी आणि हाडेही मजबूत होतात.
तुम्ही जर रात्री काकडी खाल्ली तर पोट जड होऊ शकतं. काकडी पचवणं अवघड होऊ शकतं. यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते. ज्या लोकांचं पचन कमजोर आहे त्यांनी रात्री काकडी अजिबात खाऊ नये.
जर तुम्ही सकाळी काकडी खात असाल तर याचे तुम्हाला खूप फायदे मिळतात. याने तुमचं वजन कंट्रोल होतं. जेवणाच्या अर्धातासआधी तुम्ही काकडी खावी. कारण याला पचायला वेळ लागतो.
काकडी खाण्याची योग्य पद्धत
काकडीच्या सालीमध्येही सिलिकासारखं आवश्यक पोषक तत्व असतं. पण अनेकांना काकडी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पित असाल तर ही चूक अजिबात करू नका. याने तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.
काकडी केस आणि त्वचेसाठी फार फायदेशीर असते. या फळातील पोषक तत्व शरीराला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही काकडी खाल्ल्यावर पाणी पिणं टाळलं तर. कारण काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायलात तर पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. काकडी उन्हाळ्यात फार फायदेशीर मानली जाते. हेल्दी डाएटमध्ये याचं फार महत्व आहे. कारण यात व्हिटॅमिन सी, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील फ्री रेडिकल्स दूर करतात.
हाडं होतात मजबूत
काकडी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि इम्यूनिटीही वाढते. तेच काकडीची सालही फार फायदेशीर असते. पण हेही लक्षात ठेवा की, काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. कारण त्याने त्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.
काकडी खाल्ल्यावर पाणी पिल्याचे नुकसान
- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने खाद्य पदार्थांना पचवणारं पोटातील अॅसिड योग्य प्रकारे काम करत नाही.
- जर काकडी खाऊन तुम्ही पाणी प्यायलात तुम्हाला लूज मोशन आणि डायरिया होण्याचाही धोका होऊ शकतो.
- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने शरीराची पीएच लेव्हलही डिस्टर्ब होते.