(Image Credit : The Guardian)
धावपळीच्या जीवनशैलीत हा प्रश्न नेहमीच महत्त्वाचा ठरतो की, काय तुम्ही पुरेशी झोप घेत आहात? २४ तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम केल्या जाणाऱ्या या कल्चरमध्ये जास्तीत जास्त लोकांचा अधिक वेळ हा कॉम्प्युटरसमोर काम करण्यात जातो. त्यामुळे ते स्लीपलेसनेसचे शिकार होतात. ही समस्या जगभरातील लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. इतकेच काय तर लोक झोपेसाठी आता टॅबलेटचं सेवन करून लागले आहेत. पण याला आता एक पर्याय समोर आला आहे.
लहान मुलासारखा श्वास घेतो रोबोट
या प्रयोगानंतर तुमच्यापैकी कुणालाही झोपेसाठी कोणतही औषध घेण्याची वेळ येणार नाही. हा पर्याय म्हणजे कोणतं औषध नसून एक रोबोट आहे. या रोबोटच्या मदतीने तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत मिळू शकेल. वाचून विचित्र किंवा आश्चर्याचं वाटणं सहाजिक आहे. नेदरलॅंडचे उद्योगपती जूलियन जग्टेनबर्गने एक रोबोट तयार केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, रात्री चांगली झोप घेण्यासाठी हा रोबोट मदत करेल. एका मांजरीच्या वजनाचा हा रोबोट मुलायम तर आहेच सोबतच तो एका लहान मुलासारखा श्वासही घेतो.
३ वर्षांपूर्वीची आयडिया
जूलियनला हा रोबोट तयार करण्याची आयडिया तीन वर्षांआधी आली होती. तेव्हा त्याची आई स्लीपलेसनेस या आजाराने ग्रस्त झाली होती. डॉक्टर त्यांना केवळ झोपेच्या टॅबलेट देत होते. निराश झालेल्या जूलियनने यावर समाधान शोधणं सुरू केलं. त्याने झोपेसंबंधी वाचणं सुरू केलं आणि त्याला आढळलं की, श्वास व ऑडिओच्या मदतीने चांगली झोप येऊ शकते.
शोधात खासकरून हे सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही एखादं लहान मुल पकडता किंवा जवळ घेता तेव्हा तुम्हीही त्याच्या श्वास घेण्याच्या पद्धतीला आणि हृदयाच्या गतीला फॉलो करता. या सिद्धांतावर त्याने एक प्रोटोटाइप रोबोट विकसित केलाय. हा रोबोट हळू आणि मोठा श्वास घेण्याचा आवाज करतो. पण याची साइज मोठी होती, त्यामुळे त्याच्या आईला हा रोबोट पसंत आला नाही. त्यानंतर त्याने रोबोटची साइज लहान केली, तेव्हा त्याच्या आईला झोप पूर्ण करण्यास मदत मिळाली.
(Image Credit : Sleep Gadgets)
कसं करतो काम?
रोबोट झोपण्याच्या प्रक्रियेची नकल करण्यासाठी खोट्या श्वास तंत्राचा उपयोग करतो. जेव्हा तुम्ही याला तुमच्या छातीजवळ धरता तेव्हा एखाद्या कुत्र्याला किंवा मांजरीला जवळ घेतल्याचा अनुभव होतो. यामागे उद्देश हा आहे की, जेव्हा तुम्ही याला जवळ घेता तेव्हा तुम्ही त्याच्या श्वास पॅटर्नमध्ये येता. यातील एक स्पीकर तुम्हाला झोपेसाठी प्रेरित करतो. हा रोबोट अॅपसोबतही जुळला आहे. आणि गरजेनुसार अॅपमध्ये बदलही करता येतात.