गेल्या काही दिवसांपासून आपण सॅमिटर नॅपकिन्स आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी याबाबत अनेक गोष्टी ऐकत आहोत. असातच अनेस सामाजिक संस्था सॅनिटरी पॅड्सऐवजी मेंस्ट्रुअल कपचा वापर करण्याचा सल्ला देतात. तसेच अनेक रिसर्चमधून सिद्ध झाल्यानुसार, मेंस्ट्रुअल कप्स, सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पॉन्सच्या तुलनेमध्ये अधिक फायदेशीर ठरतात. पण आता आणखी एका संशोदनातून असं सिद्ध झालं आहे की, आता सॅनिटरी पॅड्समुळे पर्यावरणाचं अजिबात नुकसान होणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं...? अनेक रिसर्चमधून सॅनिटरी पॅड्स पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात आलं आहे. मग आता असं काय सिद्ध झालं आहे? जाणून घेऊया नक्की हे संशोधन कसलं आहे आणि यातून काय सिद्ध झालं आहे त्याबाबत...
आयआयटी दिल्लीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केळ्यातील फायबरचा वापर करून सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले आहेत. हे नॅपकिन्स 122 वेळा धुवून 2 वर्षांपर्यंत पुन्हा वापरणं शक्य होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सतत वापरल्यानंतरही यामुळे कोणतही इन्फेक्शन होणार नाही. तसेच केळ्यातील फायबरपासून तयार करण्यात आलेल्या एका सॅनिटरी नॅपकिनची किंमत शंभर रूपयांपर्यंत असेल, असं सांगण्यात येत आहे.
आयआयटी दिल्लीतील बीटेकच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या अर्चित अग्रवाल आणि हॅरी सहरावत यांनी विविध विभागातील प्रोफेसरांच्या अध्यक्षतेत हे सॅनिटरी नॅपकिन तयार केलं आहे. बीटेकमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी सांफे (https://sanfe.in) या नावाने आपलं स्टार्टअप सुरू केलं. याच स्टार्टअप अंतर्गत त्यांनी हे सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले आहेत.
आयआयटीमधील डिझाइन विभागातील सहायक प्रोफेसर श्रीनिवास वेंकटरमन यांनी विद्यार्थ्यांच्या या संशोधनाचं कौतुक केलं. बोलताना त्यांनी सांगितलं की, महिलांच्या स्वास्थ आणि स्वच्छतेसाठी ही संशोधन अत्यंत फायदेशीर ठरेल. हे तयार करण्यासाठी जवळपास दीड लाख रूपये खर्च करण्यात आला. तसेच याचं पेटेन्टही करण्यात आलं आहे.
असं केलं सॅनिटरी नॅपकिन तयार...
अर्चित अग्रवाल आणि हॅरी सहरावत यांनी सांगितल्यानुसार, चार लेअर्सचं हे सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी पॉलिस्टर पिलिंग, केळ्यातील फायबर आणि कॉटन पॉलियूरेथेन लेमिनेटचा वापर करण्यात आला आहे. केळ्याचा देढ आणि टाकून देतो. त्यातील फायबर काढून मशीनमध्ये सुकवण्यात आलं.
केळ्यातील हे फायबरच्या वर पॉलिएस्टर पिलिंग (एक प्रकारचं कापड)चा वापर करण्यात आला. हे ओलावा शोषून घेतं. त्यानंतर लीकेज रोखण्यासाठी कॉटन पॉलियूरेथेन लेमिनट (एक प्रकारचं केमिकल) वापरण्यात आलं. याच्या मदतीने सॅनिटरी पॅड कव्हर करण्यात आलं. इतर पॅड्समध्ये प्लास्टिक आणि सिंथेटिकचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे ते पॅड्स पर्यावरणासाठी घातक ठरतात.
ऑनलाइन आणि बाजाराचही उपलब्ध
अर्चितने सांगितल्यानुसार, हे सॅनिटरी नॅपकिन्स विक्रीसाठी ऑनलाइन आणि बाजारामध्येही उपलब्ध आहेत. महिला हे पॅड्स थंड पाण्याने धुवून दोन वर्षांपर्यंत वापरू शकतात. पुढे बोलताना अर्चित म्हणाला की, अक्षय कुमार अभिनित पॅडमॅन हा चित्रपटामधून महिलांना मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करण्याबाबत जागरूकता मिळाली पण त्यामुळे पर्यावरणाला होणारी हानी वाचवण्यासाठी उपाय मिळाला नाही. त्याने सांगितले की, समान्य पॅड्समध्ये प्लास्टिक आणि सिंथेटिकचा वापर करण्यात येतो. तसेच वापरून झाल्यानंतर हे टाकून देण्यात येतात. हे नष्ट होण्यासाठी जवळपास 50 ते 60 वर्ष लागतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून त्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.