देशभरात काही ठिकाणी कोरोनाचा प्रसार कमी झालेला असला तरी भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचं रौद्र रुप दिसून येत आहे. महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दुसरीकडे देशाताल रिकव्हरी रेट 90% आहे. गेल्या 24 तासांत देशात 50 हजार 129 नवीन रुग्ण सापडले. तर, 578 रुग्णांचा मृत्यू झाला.
एकिकडे देशाचा रिकव्हरी रेट वाढत असताना केरळच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात 78 लाख 64 हजार 811 रुग्ण आहेत. तर एकूण मृतांची संख्या 1 लाख 18 हजार 534 झाली आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 68 हजार 154 झाली आहे. रिकव्हर रुग्णांची संख्या 70 लाख 78 हजार 123 झाली आहे. संक्रमणानंतर ७ महिन्यांपर्यंत रुग्णांमध्ये असतात कोरोनाच्या एंटीबॉडी, तज्ज्ञांचा दावा
काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. एकिकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून राज्यांचं कोरोनामुक्तीचं प्रमाण हे 89 टक्क्यांच्या आसपास गेलं आहे. राज्यात शनिवारी 10,004 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 6,417 रुग्णांची भर पडली आहे. 137 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16,38,961 आहे. तर 14,55,107 जण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत 43,152 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1,40,194 एवढ्या रुग्ण उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह बातमी! कोरोनामुळे नष्ट होतोय 'हा' जीवघेणा आजार; रुग्णांमध्ये मोठी घट, तज्ज्ञांचा दावा