शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

काळी मिरी जरी असली गुणकारी तरी जास्त सेवनाने दुष्परिणाम पडतील भारी, वाचा तोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 5:13 PM

काळी मिरी आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते. जी धोकादायकदेखील असू शकते. चला तर मग जाणून घेऊया अति प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते.

प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळणारी काळी मिरी अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरली जाते. याशिवाय काळी मिरी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. याचा उपयोग चहा आणि काढा बनवण्यासाठी केला जातो. काळी मिरी आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध, काळी मिरी लिव्हर, आतडे आणि किडनीचीदेखील काळजी घेते. त्यात कर्करोगविरोधी गुणधर्मदेखील आहेत. इतके फायदे असूनही काळी मिरी आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते. जी धोकादायकदेखील असू शकते. चला तर मग जाणून घेऊया अति प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते.

गॅसची समस्या वाढू शकतेस्टाइलक्रेजच्या मते, अधिक काळी मिरी खाल्ल्याने गॅस्ट्रिक म्यूकोसल समस्या वाढू शकतात. याचे सेवन केल्यावर घसा आणि पोटात जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. याशिवाय बद्धकोष्ठता, जुलाबाची समस्यादेखील होऊ शकते. काळी मिरी गरम असते. त्यामुळे तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर काळी मिरी खाणे टाळावे.

गरोदरपणात धोकागरोदरपणात गरम पदार्थ खाणे टाळावे. गरोदरपणात काळी मिरी फार कमी प्रमाणात खावी. बाळाला दूध पाजल्यास काळी मिरी अजिबात खाऊ नये. यामुळे बाळाच्या पोटात जळजळ होऊ शकते. तसेच उष्ण हवामान असले तरी काळी मिरी खाणे टाळा.

फर्टिलिटी कमी होऊ शकतेकाळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर म्हणजेच फर्टिलिटीवर लक्षणीय परिणाम होतो. जर पुरूषांनी काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ली केली तर त्यांच्या संयुग गुणधर्मांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

त्वचेच्या समस्या वाढू शकतातजर त्वचेमध्ये ओलावा असेल तर ती सुंदर आणि चमकदार दिसेल. ओलावा मिळविण्यासाठी गरम पदार्थ खाणे टाळावे. ते खाल्ल्याने त्वचेला खाज येण्याची समस्या, त्वचारोग किंवा पिंपल्सदेखील होऊ शकतात.

शिंक येऊ शकतेकाळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने शिंका येऊ शकतात. ही फार गंभीर समस्या नाही. पण त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण काळ्या मिरीमध्ये असलेले पाइपरिन हे इरिटेन्ट म्हणून काम करते आणि त्यामुळे नेजाल म्युकस मेम्ब्रेनमध्ये जळजळ वाढते आणि शिंका येणे सुरू होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स