उन्हाळ्यात शीतपेय पिणे आरोग्यासाठी धोकादायक? घरगुती पेयांना प्राधान्य देण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 01:12 PM2024-03-11T13:12:20+5:302024-03-11T13:17:16+5:30

हल्ली दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या नागरिकांकडून कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे प्रमाणही वाढले आहे.

side effects of drinking cold drinks in summer season can harmful for health says expert | उन्हाळ्यात शीतपेय पिणे आरोग्यासाठी धोकादायक? घरगुती पेयांना प्राधान्य देण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

उन्हाळ्यात शीतपेय पिणे आरोग्यासाठी धोकादायक? घरगुती पेयांना प्राधान्य देण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Health Tips for Summer Season : हल्ली दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या नागरिकांकडून कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे प्रमाणही वाढले आहे. या शीतपेयांच्या सेवनानंतर तात्पुरते बरे वाटत असले तरीही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. उन्हाळ्यात निरोगी आरोग्याच्या दृष्टीने या शीतपेयांऐवजी जुन्या काळातील घरगुती पेयांना पसंती द्यावी, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

घरगुती पेयांना द्या प्राधान्य :

उन्हाळ्यात लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, आवळ्याचे सरबत, कोकम सरबत, लस्सी, ताक घरगुती पेयांना प्राधान्य दिले पाहिजे. या पेयांमध्ये नैसर्गिक घटकांचा निरोगी आरोग्यासाठी फायदा होतो, तसेच या पेयांमधील कोणतेही घटक आरोग्यावर घातक परिणाम करत नाहीत.

रसायनांमुळे आरोग्याला धोका :

शीतपेयांमध्ये जास्त रसायनांचा वापर करण्यात येतो. परिणामी, यामुळे यकृत खराब होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय मधुमेहासोबतच हृदयविकाराचीही शक्यता हे. शीतपेयांपासून ते डाएट सोड्यामधील साखरेचे प्रमाण आणि इतर घटक आरोग्यास हानिकारक ठरतात. जे लोक भरपूर शीतपेये पितात, त्यांच्याकडे खूप कॅलरीज असतात, परिणामी वजन वाढण्याची शक्यता असते. स्थूलतेमुळे अन्य आजारांचा धोकाही बळावतो. 

पचनक्रियेवर परिणाम :

२५०-३०० मिली शीतपेयामध्ये १५०-२०० कॅलरीज असतात, यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता असते. जे लोक रोज शीतपेय पितात, त्यांच्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिडमुळे पचनसंस्था बिघडते. अन्न पचवण्यासाठी वापरण्यात येणारा एक घटक म्हणजे हायड्रॉलिक ॲसिड, हे पोटातच तयार होते. शीतपेयांमध्ये असलेले रसायन जेव्हा या ॲसिडमध्ये मिसळते, तेव्हा त्याचा चयापचयावर विपरित परिणाम होतो.

दूषित बर्फामुळेही नुकसान :

दूषित बर्फात ई-कोलाय विषाणू असल्यामुळे पोटदुखी, डायरिया, गॅस्ट्रो, टायफाइड, मेंदूज्वर, उलट्या, जुलाब आणि कावीळसारखे आजार होतात. तसेच बर्फाच्या गोळ्यामध्ये असणाऱ्या रंगामुळे पोटाचे विकार व त्वचाविकार वाढण्याचा धोका असतो आणि आतड्यासंबंधी संसर्ग देखील होऊ शकतो. थंड पाणी किंवा शीतपेय, बर्फाचे गोळे, सरबत पिण्याकडे कल वाढत आहे. मात्र, यामध्ये वापरण्यात येणारा बर्फ कोणत्या पाण्यापासून तयार केलेला आहे, याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार न करता सर्रास हा बर्फ उपयोगात आणला जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील, फेरीवाल्यांकडील पेय पिणे टाळावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येते.

Web Title: side effects of drinking cold drinks in summer season can harmful for health says expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.