पोटावर झोपताय, सावधान !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 10:39 AM
बहुतांश लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय कित्येक आरोग्याच्या समस्या निर्माण करु शकते. पोटावर झोपल्याने शरीराच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.
बहुतांश लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय कित्येक आरोग्याच्या समस्या निर्माण करु शकते. पोटावर झोपल्याने शरीराच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. सोबतच या पोजिशनने बॉडी पॉश्चर नैसर्गिकरित्या नाही राहत ज्यामुळे कित्येकदा बॉडी पेनदेखील होते. अशा अनेक समस्या आहेत ज्या पोटावर झोपल्याने उद्भवतात. त्याबाबत आज जाणून घेऊया.* पोटावर झोपल्याने आपल्या पाठीचा कणा नैसर्गिक शेपमध्ये राहत नाही. त्यामुळे बॅक पेनची समस्या निर्माण होते.* पोटावर झोपल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. यामुळे मसल्सचे दुखणे सुरु होते. * पोटावर झोपल्याने मानेच्या मसल्समध्ये ताण निर्माण होतो. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि मानेचे दुखणे सुरू होते. * पोटावर झोपल्याने खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचत नाही त्यामुळे अपचनाच्या समस्या निर्माण होतात.* पोटावर झोपल्याने मान वाकडी होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो त्यामुळे डोके दुखायला लागते. * पोटावर झोपल्याने चेहरा दाबला जातो आणि चेहऱ्याच्या स्किनला पुरेसा आॅक्सिजन मिळत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिंपल्स निर्माण होतात. * पोटावर झोपल्याने शरीराची हाडे योग्य पोजिशनमध्ये राहत नाही म्हणून जॉर्इंट पेनच्या समस्या निर्माण होतात.