(Image Credit : www.thespinecare.in)
तुम्हाला जर कंबरदुखीचा त्रास असेल आणि वेगवेगळेय उपाय करुनही तो बरा झाला नसेल तर एक चांगला पर्याय तुम्हाला आराम देऊ शकतो. सध्या या उपायावर शोध सुरु असून लवकरच याचा वापर सुरु होऊ शकतो. रुग्णाच्या स्टेम सेल्स(पेशी) च्या मदतीने त्यांना होणारा सततचा कंबर दुखीचा त्रास दूर केला जाऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणत्याही सर्जरीची गरज पडत नाही. अमेरिकेतील क्लीवलॅंड मेडिकल सेंटर हॉस्पिटलने हा प्रयोग नुकताच केला. संशोधकांनुसार, कंबर दुखीच्या रुग्णांमध्ये डिस्क डॅमेज झाल्याकारणाने ही स्थिती येते. इंजेक्शनच्या मदतीने रुग्णाच्या स्टेम सेल्स त्यांच्या डॅमेज डिस्कमध्ये प्रत्यारोपण केल्या जातील. याने डिस्कमध्ये सुधारणा होऊन वेदना आणि सूज दूर होईल.
काय असतात स्टेम सेल्स?
स्टेम सेल्स म्हणजेच मूलपेशी या बहुपेशीय सजीवांमध्ये सापडणाऱ्या पेशी असतात. गर्भातून मिळवलेल्या मूलपेशींपासून नंतर कुठलाही अवयव तयार करता येतो. त्यामुळे नाळेचे रक्त साठवण्याची काळजी काही पालक घेतात. वेगळ्या पेशींमध्ये परिवर्तन करून घेण्याचीही क्षमता या पेशींच्या ठायी असते.
काय म्हणाले संशोधक?
संशोधकांचं म्हणणं आहे की, स्टेम सेल्समध्ये स्वत:ला विकसीत करण्याचे गुण असतात. या सेल्सच्या मदतीने अनेकप्रकारच्या सेल्स वाढवण्यास मदत मिळते. त्यामुळे याच्या गुणाचा वापर संशोधनात करण्यात आला आहे. या शोधात असं आढळलं की, प्रभावित जागेवर इंजेक्शनच्या मदतीने स्टेम सेल्स पोहोचल्यावर डॅमेज डिस्कने स्वत:ला पुन्हा विकसीत केले,
अमेरिकेतील ओहियो येथील क्लीवलॅंड मेडिकल सेंटरमध्ये याचा प्रयोग केला जात आहे. शोधात २४ रुग्णांचा सहभाग करुन घेण्यात आला होता. त्यांना जोर स्टेम सेलचे दोन डोज दिले जात आहेत. या शोधाचा उद्देश स्टेम सेलच्या मदतीने आजाराच्या कारणांचा शोध घेणे हा आहे. त्यासाठी प्रभावित जागेवर नवीन सेल विकसीत करुन सूज आणि वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संशोधकांनी सांगितले की, या सेलच्या मदतीने वेगाने वाढणाऱ्या या कंबर दुखीच्या त्रासाला नियंत्रित केलं जाऊ शकतं.
संशोधकांनुसार, स्टेम सेल डिस्कला सामान्य आकारात आणण्यासोबतच त्याच्याभोवती लिक्विडचं प्रमाणही वाढवतात. असे झाल्याने मणक्यांची हालचाल योग्य पद्धतीने होते आणि वेदना-सूज कमी होते. या शोधादरम्यान होणारी हालचाल आणि वेदना जाणून घेण्यासाठी रुग्णांची एमआरआय टेस्टही केली जाईल.
का होते कंबरदुखीची समस्या?
व्यक्तीच्या पाठीच्या मणक्यामध्ये २६ हाडांचा समूह असतो. ही हाडे एका सॉफ्ट डिस्कच्या मदतीने एकमेकांशी जोडलेली असतात. या डिस्कमध्ये मुलायम द्रव्यपदार्थ असल्याने हाडांची हालचाल शक्य होते. पण वाढतं वय, आनुवांशिक आजार किंवा अपघातांनंतर या डिस्कच्या हालचालीमध्ये अडचण येते. डिस्कचा ओलावा हळूहळू कमी होऊ लागतो आणि रक्तप्रवाह सुद्धा कमी होतो. या कारणाने डिस्क स्वत:ला रिपेअर करुन शकत नाही. त्यामुळे कंबरदुखी आणि सूज येण्याची समस्या होते. अशात यावर उपाय म्हणून पेन किलर, स्टीरॉइड इंजेक्शन आणि फिजिओथेरपीची मदत घेतली जाते. तर फार जास्त त्रास असेल तर सर्जरी केली जाते. पण आता स्टेम सेलच्या माध्यमातून यावर उपाय करणे सहज शक्य होऊ शकतं.