Health Tips : दारू आपल्या शरीरासाठी किती घातक आहे हे वेळोवेळी एक्सपर्ट सांगत असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की, दारूचा एक थेंब पिणंही घातक असतं. याने लिव्हर डॅमेज होतं. फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सरचं हे कारण ठरू शकतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, एक पदार्थ यापेक्षाही घातक ठरतो. ज्याचं आपण रोज सेवन करतो.
वेगवेगळ्या ड्रिंक्स आणि पदार्थांमध्ये लोक भरभरून साखर टाकतात. Nature वर प्रकाशित एका शोधानुसार, साखर आपल्या शरीरासाठी दारू इतकीच घातक ठरू शकते. जेवढ्या वेळा शरीरात रिफाइंड शुगर पोहोचते तेवढ्या वेळा ती लिव्हरला नुकसान पोहोचवते.
लिव्हरचं होतं नुकसान
काही शोधांनुसार गेल्या काही दशकांमध्ये साखरेचं सेवन अनेक पटीने वाढलं आहे. यात अर्ध्या प्रमाणात फ्रुक्टोज असतात. शोधानुसार, फ्रुक्टोजमुळे लिव्हर टॉक्सिटी वाढते आणि अनेक आजारांचा धोकाही वाढतो.
लठ्ठपणामुळे अनेक आजार
जसजसा लठ्ठपणा वाढतो. शरीरात अनेक आजार आपलं घर करतात. टेबल शुगर किंवा आर्टिफिशियल शुगर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने चरबी वाढू लागते. फ्रुक्टोजमुळे तुमची भूक वाढते, ज्यामुळे गोड पदार्थ अधिक खाण्याचं मन करतं. लठ्ठपणामुळे हृदयरोगही वाढतात.
हार्ट डिजीजचा धोका
जास्त गोड खाणाऱ्या लोकांना हृदयरोगांचाही अधिक धोका अतो. अनेक शोधांमधून समोर आलं आहे की, हाय शुगरमुळे ट्रायग्लिसराइड, ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरही वाढतं. या सगळ्या गोष्टी हृदयाचे वेगवेगळे आजार होण्यासाठी कारणीभूत असतात.
साखर हृदयासाठी घातक का?
जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रूट ज्यूस, कुकीज़, कॅंडी, केकमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. यांच्या अधिक सेवनाने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. Harvard हेल्थच्या रिपोर्टनुसार, भलेही साखर थेट तुमच्या हृदयाला प्रभावित करत नसेल, पण याने अनेक समस्या वाढून हृदय प्रभावित होतं. साखर फॅटमध्ये रूपांतरित होते ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा वाढून तुम्हाला हृदयरोगाची समस्या होऊ शकते.
एनर्जीमध्ये होतो बदल
शरीरात ब्लड शुगर लेव्हल योग्य प्रमाणात ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हाही तुम्ही गोड पदार्थांचं सेवन करता तेव्हा पोटाच्या कोशिकांमध्ये जाऊन इन्सुलिन सोडतात. ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त मिठाचं सेवन करता तेव्हा याने तुम्हाला जास्त झोप किंवा लवकर थकवा येण्याची समस्या होते.
चेहऱ्यावर दुष्परिणाम
जेव्हा कधी तुम्ही साखरेचं जास्त सेवन करत तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर पडतो. तुम्हाला जास्त गोड खाल्ल्याने पिंपल्सची समस्या होऊ लागते. याच कारणाने पूर्वीच्या काळात लोक जखम झाली तर यादरम्यान गोड पदार्थांचं सेवन करण्यास मनाई करत होते. कारण याने इन्सुलिन त्वचेत तेल ग्रंथी वाढू शकतात. ज्यामुळे जखम पिकणं आणि पिंपल्स होण्याची समस्या होऊ लागते.