(Image Credit : thewowstyle.com)
सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोकांमध्ये तणाव दिसून येतो. ऑफिस वर्क करणाऱ्या लोकांमधील तणाव तर कमी होण्याचं नावचं घेत नाही. वर्किंग फिल्डचा परिणाम आपल्या लाइफस्टाइलवरही दिसू लागला आहे. डिफ्रेशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक काउंसिलिंग आणि इतर वेगवेगळ्या औषधांचा आधार घेताना दिसत आहेत. पण या सर्व गोष्टींमुळे तणाव काही केल्या कमी होत नाही, पण आरोग्याच्या इतर समस्यांचा सामना मात्र करावा लागतो. दर तुम्हाला तुमच्या आयुष्यातून तणावाला कायमचं हद्दपार करायचं असेल तर काही खास गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
अनेकदा तणाव उद्भवण्याचा संपूर्ण दोष हा मोबाइलवर टाकण्यात येतो. अनेकदा तुम्ही असं ऐकलंही असेल की, मोबाइल फोन आल्यानंतर लोकांमध्ये स्ट्रेसची समस्या आणखी वाढत आहे. त्यामुळे काही वेळासाठी फोनपासून दूर राहणं किंवा काही वेळासाठी फोन स्विच ऑफ करणं आवश्यक असतं. पण फोन स्विच ऑफ करण्यापेक्षा आपण स्वतःला काही वेळासाठी स्विच ऑफ करणं आवश्यक आहे. त्यासाठी दिवसातून कमीत कमी तीन वेळा तुम्हाला या ट्रिक्स नक्की वापरल्या पाहिजेत.
दिवसभरात काही वेळ तुम्ही तुमच्यासाठी द्या. त्यावेळामध्ये ऑफिमधील काम किंवा आयुष्यात सुरू असलेल्या समस्यांचा अजिबात विचार करू नका. मन शांत ठेवा आणि मेंदूला तणावापासून एकदम मुक्त करा. मोठा श्वास घ्या. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल. हळूहळू या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग होतील.
तणाव दूर करण्यासाठी कार ही काम...
जर तुम्ही सर्वांमध्ये राहूनही स्वतःसा एकटं समजत असाल आणि तणाव तुमचा काही केल्या पाठलाग करणं सोडत नसेल तर एखादं चांगलं पुस्तक वाचण्यास सुरुवात करा किंवा काहीतरी लिहण्यास सुरू करा. तुमच्या आवडीचं एखादं कामही तुम्ही करू शकता.
- अनेकदा रिसर्चमधून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, म्युझिक स्ट्रेस दूर करण्यासाठी मदत करतं. तुम्ही ही पद्धतही वापरून पाहू शकता.
- सकाळच्या वेळी जॉगिंग केल्याने आरोग्यासोबतच मन शांत राहण्यास मदत होते. ताज्या हवेमध्ये श्वास घेतल्याने डोकं शांत राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये हायपर होणार नाही.
- ऑफिसमध्ये मिळणाऱ्या विक ऑफचा योग्य वापर करा. हा दिवस 'माझा दिवस म्हणून मार्गी लावा. तुम्हाला शक्य असेल तर मित्रांसोबत एखादा चित्रपट पाहायला जा किंवा इतर अॅक्टिव्हिटी करा.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)