शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

पायांवर दिसतात हाय कॉलेस्ट्रॉलची ही गंभीर लक्षणे, वेळेत उपाय करा अन्यथा दुष्परिणाम नक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 12:41 PM

ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि शरीरात चरबीचे प्रमाण जास्त आहे, त्यांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. आपल्या पायात दिसणारी काही लक्षणे देखील दर्शवतात की, आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे. जाणून घेऊया (Symptoms of High Cholesterol in Legs) त्याविषयी.

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे घातक आहे. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याची शक्यता वाढते. तसेच, कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक, स्ट्रोक होण्याचा धोकाही वाढू शकतो. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, चांगले आणि खराब कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात आणि ही लक्षणे आपल्या पायातही दिसू शकतात.

अनेक लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल पातळीची लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणून याला सायलेंट किलर असेही नाव देण्यात आले आहे. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी रक्त तपासणीद्वारे शोधली जाते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि शरीरात चरबीचे प्रमाण जास्त आहे, त्यांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. आपल्या पायात दिसणारी काही लक्षणे देखील दर्शवतात की, आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे. जाणून घेऊया (Symptoms of High Cholesterol in Legs) त्याविषयी.

पाय थंड पडणे -TOI मध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, एखाद्याचे पाय आणि तळवे नेहमी थंड पडत असतील तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. काही लोकांचे तळवे उन्हाळ्यात किंवा प्रत्येक ऋतूमध्ये थंड राहतात, अशा लोकांनी डॉक्टरांशी जरूर संपर्क साधावा. उच्च कोलेस्टेरॉलची समस्या नसली तरी सर्दी इतर अनेक समस्यांमध्ये देखील असे होऊ शकते. डॉक्टरांकडून कोलेस्टेरॉलची पातळी तपासणे चांगले.

पायांच्या त्वचेच्या रंगात बदलजेव्हा कोलेस्ट्रॉल जास्त असते तेव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाहही कमी होतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. हे घडते कारण पोषक आणि ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे पेशींना योग्य पोषण मिळत नाही. पाय वर केले तर त्वचा फिकट दिसू शकते. टेबलवर पाय ठेवल्यानंतर त्वचेवर रंग जांभळा किंवा निळा दिसू शकतो.

पाय दुखणे -काही दिवसांपासून सतत पाय दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन समृद्ध रक्त शरीराच्या खालच्या भागात पोहोचू शकत नाही. यामुळे पायांमध्ये जडपणा आणि थकवा जाणवू शकतो. काही लोक उच्च कोलेस्ट्रॉलमुळे पायात दाह होत असल्याची तक्रार देखील करतात. कधीकधी ही वेदना नितंब, मांड्यांपासून तळापर्यंत पायांमध्ये होते. वेदना दोन्ही किंवा अगदी एका पायात असू शकते. चालताना, धावताना किंवा पायऱ्या चढताना ही समस्या अधिक जाणवते. वेदना विश्रांती घेतल्यानंतर निघून जाऊ शकते आणि हालचाली वाढल्यानंतर पुन्हा सुरू होऊ शकते, म्हणून डॉक्टरांना भेटणे चांगले.

रात्रीच्या वेळी पायात पेटके येणे -रात्री झोपताना वारंवार पाय दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे देखील असू शकते. यामध्ये खालच्या अंगांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होते. ही समस्या रात्री अधिक तीव्र होते, त्यामुळे झोप येत नाही. तळवे, घोटे, बोटे, पाय यांच्या स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात. पाय अंथरुणावर लटकत ठेवल्यास किंवा बसून राहिल्यास क्रॅम्पपासून आराम मिळतो. कारण, गुरुत्वाकर्षण पायांना रक्त प्रवाहात मदत करतं.

तळवे किंवा पायाच्या जखमा भरत नाहीत -तळवे आणि पायात काही जखमा असतील, ज्या बऱ्या होत नसतील तर ते उच्च कोलेस्ट्रॉलमुळे देखील असू शकते. कधीकधी अशा समस्या रक्त परिसंचरण खराब झाल्यामुळे उद्भवतात. ज्या जखमा खूप हळूहळू बऱ्या होतात किंवा अनेक दिवस बऱ्या होत नाहीत, तर याचा अर्थ असा होतो की कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्याने पायांमध्ये रक्तप्रवाह नीट होत नाही. याबाबत डॉक्टरांना भेटणे चांगले.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स