फक्त सिगारेटच नाही तर या गोष्टींमुळेही फुप्फुसं होतात खराब, लगेच खाणं करा बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 03:32 PM2024-03-28T15:32:19+5:302024-03-28T15:32:44+5:30
सामान्यपणे तंबाखू आणि स्मोकिंग केल्याने फुप्फुसं खराब होतात. या गोष्टींमुळे फुप्फुसांचा कॅन्सरही होऊ शकतो. पण यांशिवाय इतरही काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे फुप्फुसं निकामी होतात.
Food That Effects Your Lung: शरीरातील सगळेच अवयव शरीराचं काम योग्यपणे चालण्यासाठी महत्वाचे असतात. यातील एक महत्वाचा अवयव म्हणजे फुप्फुसं. फुप्फुसं जर योग्यपणे काम करत नसतील तर श्वास घेण्याची समस्या होऊ शकते आणि तुमचा जीवही जाऊ शकतो. सामान्यपणे तंबाखू आणि स्मोकिंग केल्याने फुप्फुसं खराब होतात. या गोष्टींमुळे फुप्फुसांचा कॅन्सरही होऊ शकतो. पण यांशिवाय इतरही काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे फुप्फुसं निकामी होतात.
प्रोसेस्ड मीट
प्रोसेस्ड मीट तुमच्या फुप्फुसांसाठी फार जास्त नुकसानकारक असतात. यांना खाण्या लायक बनवण्यासाठी यात नायट्रेट मिक्स केलं जातं जे फुप्फुसांसाठी फार नुकसानकारक असतं. यामुळे फुप्फुसांमध्ये सूज वाढते.
शुगर असलेले ड्रिंक्स
उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी अनेकदा कोल्ड ड्रिंक्स किंवा थंड पदार्थांच सेवन करतात. याने गळ्याला तर थंडावा मिळतो पण यामुळे खोकला आणि कफ खूप वाढतो. ज्या लोकांना अस्थमाची समस्या आहे त्यांनी यांपासून दूर रहायला हवं.
मिठाचं जास्त सेवन
जेवणातून जास्त मीठ खात असाल तर यानेही फुप्फुसं खराब होतात. जास्त मिठामुळे फुप्फुसांवर सूज येते आणि अस्थमाही होऊ शकतो. त्यामुळे रोज कमी मीठ सेवन करा.
मद्यसेवन
मद्यसेवनाचा थेट प्रभाव लिव्हरवर पडतो. लिव्हरसोबतच याने फुप्फुसंही खराब होतात. अल्कोहोलमध्ये सल्फाइट आणि इथेनॉल असतं ज्यामुळे अस्थमा होतो.
तळलेले पदार्थ
बाहेरचे तळलेले पदार्थ खाल्ल्याने लंग्स कॅन्सरचा धोका खूप वाढतो. यांमध्ये कार्ब्स असतात ज्यामुळे शरीरात कार्बन डाय ऑक्साइड तयार होतं आणि फुप्फुसांना खराब करतं. त्यामुळे बाहेर तळलेले भाजलेले पदार्थ खाणं टाळा.