(Image credit- Istock)
सगळ्यांनाच कल्पना आहे की, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या माहामारीनं घातक रूप घेतलं आहे. ब्रिटन, जर्मनीसह इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने कहर केलेला दिसून येत आहे. ताप, खोकला, सर्दी, वास न येणं, मासपेशीतील वेदना कोरोना संसर्गानंतर जाणवतात. तुम्हाला माहित आहे का? कोरोना संक्रमणाची अन्य काही लक्षणंसुद्धा आहेत. ही लक्षणं त्वचेशी निगडीत असून सुरुवातीला या लक्षणांकडे लक्ष न दिल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोणताही लक्षणं दिसून येतात याबाबत सांगणार आहोत.
त्वचेवर सूज येणं
कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर त्वचेवर सुज येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. ही एखाद्या प्रकारची एलर्जीसुद्धा असू शकते. यात लाल चट्टे येणं, शरीर लाल होणं यांचा समावेश आहे. जवळपास ६ पैकी एका रुग्णाला अशी लक्षणं दिसल्यानंतर रुग्णालयात भरती करावं लागतं. काही लोकांमध्ये अशी लक्षणं दिसल्यानंतर बरं होण्यासाठी बराच कालावधी लागतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. चट्टे येणं, सुज येणं ही लक्षणं लहान मुलांमध्ये संक्रमण झाल्यानंतर दिसून येतात.
शरीरावर चट्टे येणं
कोरोना व्हायरस बर्याच लोकांच्या नसा आणि रक्तवाहिन्यांमधे पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे त्वचेवर दिसणारी जळजळ होऊ शकते. या जळजळीमुळे तुमच्या शरीरावर पुरळ उठू शकते. लाल रंगाच्या चट्यांमुळे तीव्रतेने खाज येते. जर लहान मुलांची त्वचा फिकट किंवा कोरडी दिसत असेल तर ती कोरोना संसर्गाचेही लक्षण असू शकते. मुलांच्या पाय, हात, ओटीपोट किंवा पाठीवर कोरडेपणा किंवा डाग आढळू शकतात.
ओठ कोरडे पडणं
आपण कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त असल्यास, त्याचा ओठांवर किंवा घश्यावर परिणाम होऊ शकतो. ओठ कोरडे पडणे, घसा खवखवणे ही संक्रमणाची लक्षणे देखील उद्भवू शकतात. जेव्हा आपण डिहायड्रेटेड असा तेव्हा आपल्याला पुरेसे पोषण मिळत नाही तेव्हा आपले कोरडे ओठ देखील येऊ शकतात. त्याचवेळी ऑक्सिजनच्या अभावामुळे ओठ निळे होतात. हे कोरोना संसर्गाचे सगळ्यात मोठं लक्षण असू शकतं. काळजी वाढली! फेब्रुवारी मार्चमध्ये भारतात येणार कोरोनाची दुसरी लाट? तज्ज्ञांनी सांगितले की.....
सगळ्यात जास्त धोका कोणाला?
अभ्यासानुसार ज्यांना विशिष्ट रोग आहेत. उदाहरणार्थ, श्वसन विकार, लठ्ठपणा आणि काही ज्येष्ठ ज्यांची प्रतिकारशक्ती प्रभावित होऊ शकते. त्याचवेळी, जे लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि कोविड -१९ पासून बरे झाले आहेत त्यांना त्वचेच्या संसर्गाचा धोका जास्त होण्याचा धोका असल्याने त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ..म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती