पावसाळ्यात अशा पद्धतीने स्वच्छ करा पालेभाज्या, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:16 PM2024-06-18T15:16:29+5:302024-06-18T15:17:04+5:30
How to clean vegetables : या दिवसांमध्ये फळं किंवा पालेभाज्यांवर कीटकनाशकांचे फरावे मारले जातात. रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो.
How to clean vegetables : पावसाला सुरू झाली की, वातावरण बदलामुळे, पाण्यामुळे वेगवेगळे आजारही डोकं वर काढतात. खासकरून या दिवसांमध्ये पालेभाज्या खूप सांभाळून खाव्या लागतात. या दिवसांमध्ये फळं किंवा पालेभाज्यांवर कीटकनाशकांचे फरावे मारले जातात. रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात.
अनेकदा भाज्या किंवा फळांवर अनेक केमिकल्स वापरले जातात. ज्यामुळे कॅन्सरचा धोकाही असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये भाज्या किंवा फळं फक्त पाण्याने धुवून चालत नाही. त्यांची स्वच्छता करताना खूप काळजी घ्यावी लागते. भाज्या कशा स्वच्छ कराव्या हे आज आपण जाणून घेणार आहोत.
भाज्या धुण्याची योग्य पद्धत
पावसाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फळं आणि भाज्या जर केवळ पाण्याने स्वच्छ करणं महागात पडू शकतं. पाण्याने फळं आणि भाज्यांवरील धूळ-माती तर स्वच्छ होते, पण पेस्टीसाइड आणि कीटकनाशक औषधांचा प्रभाव पूर्णपणे दूर होत नाही. एक्सपर्ट सांगतात की, पेस्टीसाइड योग्यप्रकारे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरावा. बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करून भाजी किंवा फळं स्वच्छ करणे अधिक चांगलं ठरेल.
रिसर्च काय सांगतो?
जर्नल ऑफ अॅग्रीकल्चर अॅन्ड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, बेकिंग सोड्याचा वापर करुन कीटकनाशक आणि पेस्टीसाइड्सचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्यात फळं आणि भाज्या एक मिनिटांसाठी ठेवल्या तर पेस्टीसाइड्सचा प्रभाव दूर होतो. जर जास्त पेस्टीसाइड्सचा उपयोग केला गेला असेल तर पाणी बेकिंग सोड्यामध्ये फळं आणि भाज्या १० ते १५ मिनिटांसाठी भिजवून ठेवाव्यात.
बेकिंग सोडा एकप्रकारे सोडियम बायकार्बोनेट असतं, जे कीटकनाशक औषधे आणि पेस्टीसाइड्सला स्वच्छ करण्याच्या कामात येतं. पेस्टीसाइड्सचं सर्वात प्रचलित रुप थायबेंडाजोल आणि फॉस्फेट याने सहजपणे स्वच्छ करता येतं. पण काही फळांच्या आता फळं लवकर पिकण्यासाठी किंवा रोग नष्ट करण्यासाठी कीटकनाशक औषध इंजेक्ट केलं जातं. हे कीटकनाशक बेकिंग सोड्याच्या मदतीने साफ केलं जाऊ शकत नाही.