'हा' आजार असल्यास कोरोनाचा धोका दुप्पट; तात्काळ चाचणी करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:05 PM2020-08-27T18:05:39+5:302020-08-27T18:13:44+5:30

CoronaVirus News & Latest Updates : ज्या लोकांचे खाणंपिणं, आहार, सवयी व्यवस्थित नसतात तसंच ज्यांना धुम्रपानाची सवय असते. अशा लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. परिणामी या व्हायरसचं संक्रमण जीवघेणं ठरू शकतं. 

Union health ministry recommends coronavirus test for all tuberculosis patients | 'हा' आजार असल्यास कोरोनाचा धोका दुप्पट; तात्काळ चाचणी करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

'हा' आजार असल्यास कोरोनाचा धोका दुप्पट; तात्काळ चाचणी करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

Next

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं टीबी म्हणजे क्षय रोगानेग्रस्त असलेल्या रुगांना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार अन्य लोकांच्या तुलनेत टीबी या आजाराने पिडीत असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका दुप्पट असतो. त्यासाठी टीबीची उपचार घेत असलेल्या सगळ्या रुग्णांची तपासणी होणं आवश्यक आहे. एका संशोधनातून दिसून आले की, कोरोनाच्या 0.37 ते4.47 रुग्णांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. टीबीचे रुग्ण असलेल्या लोकांना तसंच या आजारातून बाहेर आलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. 

वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार याबाबत आरोग्यं मंत्रालयानं दिशानिर्देश जारी केले आहेत. कोरोना संक्रमणादरम्यान टीबीच्या रुग्णांचा धोका जास्त वाढतो. याशिवाय  टीबीनेग्रस्त असलेल्या लोकांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांचे खाणंपिणं, आहार, सवयी व्यवस्थित नसतात तसंच ज्यांना धुम्रपानाची सवय असते. अशा लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. परिणामी या व्हायरसचं संक्रमण जीवघेणं ठरू शकतं. 

मंत्रालयानं दिलेल्या माहितीनसार टीबी आणि कोविड १९ असे आजार आहेत. ज्यात फुफ्फुसांवर आक्रमण होतं. आकडेवारीनुसार मागच्या वर्षांच्या तुलनेत जानेवारी आणि जून महिन्यात कोरोनाच्या माहामारीमुळे मृत्यू होत असलेल्या टीबीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यातून असं दिसून येतं की, टीबी असलेल्या रुग्णांना या माहामारीचा धोका जास्त आहे. 

दरम्यान जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 32 लाखांच्या वर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

याच दरम्यान कोरोनाचा धक्कादायक ग्राफ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांत देशात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसाला जवळपास 1000 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. देशातील रुग्णसंख्या रोज नवा उच्चांक गाठत असून 32 लाखांचा टप्पा आता पार केला आहे.

 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे अनेक नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 लाख 34 हजार 475 वर पोहोचली असून कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 59,449 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 7,07,267 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 24,67,759 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हे पण वाचा-

लढ्याला यश! भारतात कोरोनाची 2 सर्वात स्वस्त औषधं आली; एक टॅब्लेट 55 रुपयांना

युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार? 

Web Title: Union health ministry recommends coronavirus test for all tuberculosis patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.