ओव्हेरियन कॅन्सरचं कारण ठरू शकतं वजन वाढणं; महिलांनी 'या' लक्षणांकडे वेळीच द्यायला हवं लक्ष

By Manali.bagul | Published: February 1, 2021 02:04 PM2021-02-01T14:04:54+5:302021-02-01T14:10:56+5:30

Health Tips in Marathi : या आजाराचे खूप उशीर निदान झाल्यास उपचार करणं खूप कठीण होतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  खूप कमी लोकांना या लक्षणांबाबत अधिक माहिती असते.

Weight loss tips in Marathi: Symptoms of ovarian cancer and obesity in women | ओव्हेरियन कॅन्सरचं कारण ठरू शकतं वजन वाढणं; महिलांनी 'या' लक्षणांकडे वेळीच द्यायला हवं लक्ष

ओव्हेरियन कॅन्सरचं कारण ठरू शकतं वजन वाढणं; महिलांनी 'या' लक्षणांकडे वेळीच द्यायला हवं लक्ष

googlenewsNext

खाण्यापिण्यातील अनियमितपणामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. पण अचानक वजन वाढणं,  शरीर फुगणं ओव्हेरियन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. गायनॅकोलॉजिस्ट डॉ. गौरी अग्रवाल यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार ओव्हरी म्हणजेच अंडाशयाचा कॅन्सर सुरू होतो तेव्हा फॅलोपियन ट्यूबमधील पेशींची अनियंत्रित वाढ होते. या आजाराचे खूप उशीर निदान झाल्यास उपचार करणं खूप कठीण होतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  खूप कमी लोकांना या लक्षणांबाबत अधिक माहिती असते. आज आम्ही तुम्हाला या ओव्हेरियन कॅन्सरशी निगडीत काही लक्षणं आणि आजारापासून बचावाचे उपाय सांगणार आहोत. 

शरीरातील काही अवयवांना सूज येणं, लठ्ठपणा यासाठी नेहमीच आपण खाण्यापिण्याला दोष देऊ शकत नाही. शरीरात वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असतात. त्यामुळे ओव्हेरियन कॅन्सरचा धोका उद्भवतो. सगळ्यात आधी या आजाराच्या सुरूवातीच्या लक्षणांना समजण गरजेचं आहे. 

लक्षणं

पोट किंवा बेंबीच्या खालच्या भागात वेदना होतात

झोपण्यासाठी त्रास होऊ शकतो

सतत लघवी येते

भूक कमी लागणं

कमी खाल्यानंतर पोट जास्त भरल्याप्रमाणे वाटणं

अनियमित मासिक पाळी

अन्न पचण्यास त्रास होणं, पोट खराब असणं

जर ओव्हेरियन कॅन्सरचे  योग्यवेळी उपचार उपचार केले गेले तर गंभीर परिस्थिती किंवा मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. वर नमूद केलेली लक्षणे दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. तपासणीनंतर डॉक्टर आपल्याला योग्य सल्ला आणि उपचार देईल. सामान्यत: केमोथेरपी आणि हार्मोन थेरपी या आजाराच्या उपचारासाठी दिली जाऊ शकते. 

कोरोना व्हायरसमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम?; नवीन संशोधनातून खुलासा

या कॅन्सरदरम्यान थेरेपीमुळे शरीरातील उर्जा कमी होते. त्यामुळे तुम्हाला अचानक थकवा जाणवू शकतो.  वजन वाढणं हे या स्थितीत सामान्य असते. कॅन्सरवर करण्यात आलेल्या केमोथेरपीमुळे क्रेविंग्स वाढते. त्या कारणास्तव, तुम्ही गोड, ब्रेड किंवा मैदापासून बनवलेल्या वस्तूंचा आहारात समावेश करता. वजन वाढण्याचेही हे एक मोठे कारण आहे. अनेकदा भरलेल्या पोटासह मळमळ होण्याची समस्या कमी जाणवते. 

Brushing Tips: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग वेळीच जाणून घ्या योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर

ओव्हेरियन कॅन्सरदरम्यान किमोथेरेपी आणि हार्मोन्स थेरेपीमुळे वजन वाढतं.  कॅन्सरच्या पेशी  वाढत जातात.  तसतसं पोटातील या द्रवाचा संचय वाढत जातो. काही कॅन्सरची अशी औषधं आहेत. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त पाणी तयार होते. ओव्हेरियन कॅन्सरमध्ये महिलांना योग्यवेळी उपचार न मिळाल्यास मृत्यूचाही सामना करावा लागू शकतो. त्यासाठी लक्षणं ओळखल्यानंतर बचावाचे उपाय करणं गरजेचं आहे.

उपाय

कमी कॅलरीजयुक्त आहाराचे सेवन करायला हवं, जेवणात जास्तीत जास्त मीठाचा समावेश असू नये, जास्त गोड पदार्थ खाऊ नका, वाफवलेले अन्नपदार्थ खाण्याचा प्रयत्न करा, एकत्र जास्त अन्न खाऊ नका, मासाहाराचा आहारात समावेश करा, बीया, मटार, अन्नाचे भरपूर सेवन करा, ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. बदलती जीवनशैली अनेक आजारांचे कारण ठरू शकते. म्हणून जर तुमचं वजन वाढत असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.  योगा, मेडिटेशन आणि योग्य आहार आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

Web Title: Weight loss tips in Marathi: Symptoms of ovarian cancer and obesity in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.