झटपट वजन कमी करायचयं?; 'वॉटर वर्कआउट' का नाही ट्राय करत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:56 PM2019-04-12T12:56:20+5:302019-04-12T13:00:10+5:30

वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमिंग, एरोबिक्स, वॉकिंग इत्यादी अनेक फिटनेस चॅलेंज ट्राय केले जातात. तरिदेखील वजनामध्ये फारसा फरक दिसून येत नाही.

Weight loss tips water workout will help you lose belly fat and body weight quickly | झटपट वजन कमी करायचयं?; 'वॉटर वर्कआउट' का नाही ट्राय करत?

झटपट वजन कमी करायचयं?; 'वॉटर वर्कआउट' का नाही ट्राय करत?

Next

(Image Credit : theclubfit.com)

वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमिंग, एरोबिक्स, वॉकिंग इत्यादी अनेक फिटनेस चॅलेंज ट्राय केले जातात. तरिदेखील वजनामध्ये फारसा फरक दिसून येत नाही. मग बाजारात मिळणाऱ्या वेट लॉस प्रोडक्टचा आधार घेण्यात येतो. पण याऐवजी तुम्ही वॉटर वर्कआउट ट्राय करू शकता. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? हे वर्कआउट स्विमिंग पूलमध्ये करण्यात येतं. म्हणजेच, येथे पूलमध्येच जिम असते. हे शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासोबतच तुम्हाला अनेक आजारांपासूनही दूर ठेवण्याचं काम करतो. वॉटर वर्कआउट नियमितपणे केल्याने शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. एवढचं नाही तर वजनही कमी होतं.

वॉटर वर्कआउट म्हणजे नक्की काय?

वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असलेलं हे वर्कआउट स्विमिंग पूलमध्ये करण्यात येतं. या वर्कआउटला अॅरो वर्कआउट किंवा अॅक्वा वर्कआउट असंही म्हटलं जातं. हे वर्कआउट वाहत्या पाण्यामध्ये नाही तर थांबलेल्या पाण्यामध्ये करण्यात येतं. त्यामुळे स्विमिंग पूल या वर्कआउटसाठी उत्तम पर्याय ठरतो. पाण्याचा स्तर 3 फूटपेक्षा अधिक असू नये. गुडघे, पेल्विक किंवा जास्तीत जास्त चेस्टपर्यंत पाणी असणं आवश्यक असतं. तसेच यामध्ये पाण्याचं तापमानही लक्षात घेणं गरजेच असतं. वॉटर वर्कआउट करताना पाण्याचं तापमान 20 ते 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक असू नये. 

(Image Credit : calendar.buffalo.edu)

वाटर वर्कआउट करण्याचे फायदे :

1. तज्ज्ञांच्या मते, पाण्यामध्ये एक्सरसाइज करताना शरीराचं वजन फक्त 10 टक्क्यांपर्यंत राहतं. त्यामुळे शरीराला जाणवणारी सांधेदुखी, लठ्ठपणा, डायबिटीज इत्यादींपासून सुटका होते. 

2. वॉटर वर्कआउटमुळे स्नायू बळकट होत असून तणावही दूर होतो. शरीर जेव्हा पाण्यामध्ये असतं. तेव्हा वजन कमी जाणवतं. त्यामुळे शरीरावर व्यायामाचा प्रभाव फार कमी होतो. ज्यामुळे मसल्सवर प्रेशर येत नाही. पाण्यामध्ये एक्सरसाइज केल्यामुळे मूड फ्रेश होतो. हे वर्कआउट कोणत्याही वयाच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरतं. 

3. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी किंवा संध्याकाळीच वॉटर वर्कआउट करा अन्यथा स्किन टॅन होते. टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी वॉटर वर्कआउट करण्याआधी 20 मिनिटं आधी त्वचेवर सनस्क्रिन लावा. 

(Image Credit : aquaticsintl.com)

4. पाण्यामध्ये एक्सरसाइज केल्याने मसल्सवर प्रेशर येत नाही. एका तासासाठी वर्कआउट केल्याने 300 ते 600 कॅलरी बर्न होतात. यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होतात. तसेच वॉटर वर्कआउट वापरून शरीर सुरक्षित पद्धतीने फिगरमध्ये आणू शकता. 

5. पाण्यामध्ये व्यायाम केल्याने मुका मार लागत नाही. तसेच शरीराचे सांधे अधिक लवचिक होतात. ज्यामुळे ते अधिक सक्रिय होतात. 

6. स्नायू लवचिक झाल्यामुळे अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो. ज्यामुळे हे अधिक सक्रिय होतात. 

7. पाण्यामध्ये एक्सरसाइज कल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या होत नाही. यामुळे हार्टबीट्सही सुरळीत होतात. तसेच हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. 

Web Title: Weight loss tips water workout will help you lose belly fat and body weight quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.