Weight loss tips : वजन कमी होता होत नाहीये? मग या 2 प्रकारच्या भाताचा आहारात समावेश करा; मग बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:23 PM2021-03-31T19:23:59+5:302021-03-31T19:38:39+5:30

Weight loss tips : बॅलेन्स्ड डाएटबाबत आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते, त्यामुळे अनेकदा पोटभर नाश्ता किंना जेवणं केल्यानंतरही शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

Weight loss tips : Weight loss tips eat these 2 type of rice for weight loss | Weight loss tips : वजन कमी होता होत नाहीये? मग या 2 प्रकारच्या भाताचा आहारात समावेश करा; मग बघा कमाल

Weight loss tips : वजन कमी होता होत नाहीये? मग या 2 प्रकारच्या भाताचा आहारात समावेश करा; मग बघा कमाल

Next

(Image Credit- The Kitchen)

रोजच्या धावपळीमुळे अनेकदा शरीराकडे दुर्लक्षं होतं. तसेच शरीराला आवश्यक अशा पोषक तत्वांची कमतरता भासते. खरं तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला दररोज काही पोषक तत्वांची गरज भासते. पण रोजच्या कामाच्या धावपळीमुळे सर्व पोषक तत्व आरोग्याला मिळतातच असं नाही. दैनंदिन कामांसाठी न्यूट्रीएंट्स शरीरासाठी आवश्यक असतात.

हे न्यूट्रीएंट्स आपल्या आहारातून शरीराला मिळतात. असा आहार जो आपल्या शरीराच्या सर्व गरजांना पूर्ण करू शकेल त्यालाच बॅलेन्स्ड डाएट असं म्हटलं जातं. बॅलेन्स्ड डाएटबाबत आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते, त्यामुळे अनेकदा पोटभर नाश्ता किंना जेवणं केल्यानंतरही शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

कार्बोहायड्रेट प्रोटीनच्या तुलनेत शरीराला लवकर उर्जा प्रदान करतात. याची व्यायामावेळी अधिक आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट मांसपेशींमध्ये ग्लायकोजनची गरज भरुन काढण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे साध्या भातापेक्षा  आहारात ब्राउन राइस, क्विनोआ यासारख्या पदार्थांचं सेवन करणं महत्त्वाचं ठरतं. आज आम्ही तुम्हाला ब्राऊन राईस आणि क्विनोआच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. 

१) पांढ-या तांदळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसकट असते. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये  शरीरासाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते. यामुळे ब्राऊन राईस जास्त खाल्ला तरी फारसा फरक पडत नाही. 

२) ब्राऊल राईसपेक्षाही क्विनोआ आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो. ब्राउन राइसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. क्विनोआ राइस रक्तदाब कमी करण्यास मदत करते. क्विनोा साधारणपणे ज्वारीप्रमाणे दिसते. हे बारिक दाणे पचायला हलके असतात. ब्राउन राइसमध्ये क्विनोआसारखे कमी ग्लाइसेमिक इंडेक्स आहेत. क्विनोआ राइस खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाहीतर बऱ्याचवेळ पोट भरल्या सारखं वाटत.

तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत  

३) क्विनोआ एक ग्लूटन फ्री सुपरफूड आहे जे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि अमीनो अॅसिड यांसारखी पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. नाश्त्यामध्ये याचं सेवन केल्याने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. त्याचसोबत हे स्टॅमिना वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते.

पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

४)  ब्राउन राइसमध्ये थायमिन, निअॅसिन, व्हिटामीन बी-6, मँगेनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह 2, जस्त इत्यादी असतात. जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. यामुळे आहारामध्ये पांढऱ्या तांदळाच्या भातापेक्षा ब्राउन राइस खाणे फायदेशीर आहे. कारण ब्राउन राइसने वजन देखील वाढत नाही. म्हणून मेंटेंन राहण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात तुम्ही ब्राऊन राईस किंवा क्विनोआचा समावेश करू शकता. 

Web Title: Weight loss tips : Weight loss tips eat these 2 type of rice for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.