प्रमाणापेक्षा जास्त ताण आला असेल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 10:51 AM2018-10-22T10:51:34+5:302018-10-22T10:52:00+5:30

वेगवेगळ्या कारणांनी व्यक्तींना येणारा ताण हा नेहमीच त्रासदायक असतो. ताण कमी असेल तर फार फरक पडत नाही पण हाच जर जास्त झाला तर याचा जीवनावर आणि कामावर गंभीर परिणाम होतो.

When stress cross your limit then be aware | प्रमाणापेक्षा जास्त ताण आला असेल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे! 

प्रमाणापेक्षा जास्त ताण आला असेल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे! 

googlenewsNext

(Image Credit : Live Science)

वेगवेगळ्या कारणांनी व्यक्तींना येणारा ताण हा नेहमीच त्रासदायक असतो. ताण कमी असेल तर फार फरक पडत नाही पण हाच जर जास्त झाला तर याचा जीवनावर आणि कामावर गंभीर परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त ताण आल्याने ऑफिस किंवा घरातील तुमची सर्व कामे प्रभावित होऊ शकतात.

ही ती स्थिती असते जेव्हा एखादी व्यक्ती सहन करण्याची क्षमता गमावून बसतो. या कारणाने ही व्यक्ती कामात चांगलं प्रदर्शन करु शकत नाही. तज्ज्ञांचं मत आहे की, तणावाचं प्रमाण हे वेगवेगळ्या व्यक्ती, परिस्थीती आणि वैयक्तिक क्षमतेनुसार वेगवेगळी असते. 

तणावाचं प्रमाण पॅरामिटर्सच्या आधारावर मॉनिटर केलं जाऊ शकतं. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला तणावाच्या स्त्रोतापासून दूर जायचं असेल तरच...तणावाच्या मोठ्या कारणांपासून बचाव करण्याची इच्छा हे तणाव वाढण्याचं मुख्य कारण असण्याचं संकेत आहे. डॉक्टरांनुसार, 'अनेकजण जास्त तणावाच्या वातावरणात जीवन जगणे सुरुच ठेवतात. त्यांना या गोष्टींची माहितीच नसते की, सतत होणारी डोकेदुखी, सतत येणारा राग आणि शांत झोप न लागणे ही तणावाची कारणे असू शकतात. हे सामान्य लक्षण तणावाची असू शकतात आणि हे तुम्हाला स्वत:ला ओळखावी लागतात. जेव्हा तुमचा तणाव प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा तुमचं दैनंदिन जीवन प्रभावित होतं'.

काय होतं नुकसान?

तणावामुळे तुमची विचार करण्याची, समजून घेण्याची प्रक्रिया प्रभावित होते. याच्या सामान्य लक्षणांमध्ये सतत डोकेदुखी, वजन कमी-जास्त होणे, झोन न येणे, जेवण योग्य प्रमाणात न होणे, सतत आजारी पडणे, लक्ष केंद्रीत न करु शकणे, मूड स्विंग होणे आणि हायपरअॅक्टिव किंवा ओव्हर सेन्सीटीव्ह होणे. काही वेळी हे डिप्रेशनही असू शकतं. 

डॉक्टरांनुसार, 'फार जास्त वेळ तणावात राहिल्याने इम्युनिटी आणि हार्मोन्सवर प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्हाला जास्त अस्वस्थ वाटू लागतं. कामात कमी लक्ष लागतं'.

आरोग्यावर परिणाम

फार जास्त काळ तणावात राहिल्याने हृदय आणि ब्लड वेसल्ससंबंधी आाजार होऊ शकतात. तणाव जास्त काळ राहिल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन्स जास्त वाढतात. कॉर्टिकोस्टेरॉईडसारखे स्ट्रेस हार्मोन्स ब्रेनच्या न्यूट्रॉन्समध्ये केमिकल्स कमी करतात. याने तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. तसेच तुम्हाला आजूबाजूला होत असलेल्या कोणत्याच गोष्टीत रस राहत नाही. 

काय कराल उपाय?

- आधी आलेल्या अनुभवामुळे कामकाजावर परिणाम होऊ देऊ नका.

- परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. 

- असहायता, निराशा, दु:ख विसरुन आपल्या क्षमतेवर फोकस करा.

- तुमची वागणूक बदला, शांतपणे बोलण्यास सुरुवात करा.

- मित्र परिवाराकडे आपल्या मनातील गोष्टी सांगा.

- घडून गेलेल्या गोष्टींचा सतत विचार करु नका.

- सकारात्मक विचार करा.

Web Title: When stress cross your limit then be aware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.